Sharad Pawar gave free Remedicivir injection for Nagarkars 
अहिल्यानगर

शरद पवार यांनी नगरकरांसाठी दिली मोफत रेमडिसिवीर इंजेक्शन

सकाळ वृत्तसेवा

नगर : नगर जिल्ह्यातील रेमेडिसीवर इंजेक्‍शनचा साठा संपल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या इन्फेक्‍शनमुळे मृत्यू पावण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे.

या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते शरद पवार यांच्याकडे नगरकरांसाठी रेमेडिसीवर इंजेक्‍शनची मागणी केली होती. त्यानुसार शरद पवार यांनी तत्काळ मोफत रेमेडिसीवर इंजेक्‍शनचा साठा पाठवून दिला आहे.

नगर जिल्ह्यामध्ये रेमेडिसीवर इंजेक्‍शनचा साठा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सरकारने लगेच तत्काळ पुरवठा सुरु केला.

हे इंजेक्‍शन सर्वसामान्य कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. यासाठी अहमदनगर शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

या वेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भुपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते. 

दत्ता गाडळकर हे या क्षेत्रामध्ये चांगले काम करत असून, गरजूंपर्यंत हे इंजेक्‍शन पोहचवू शकतील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Pinky Mali : 'अजितदादा आणि पिंकी दोघांनीही आपला शब्द पाळला नाही’, पिंकी माळीचे वडील भावूक

IND vs AUS: भारताविरुद्धच्या वनडे, टी२० अन् कसोटी मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाचे संघ जाहीर; नव्या कर्णधाराचीही झाली नियुक्ती

Ajit Pawar : अजितदादांचा तो दौरा ठरला अखेरचा! भगूरकरांना दिलेला 'शब्दाचा पक्का' वादा अधुराच राहिला

Ajit Pawar : ‘असे दादा पुन्हा होणे नाही, मिळणे नाही’; अजित पवार यांच्या जाण्याने मावळातील पदाधिकारी, कार्यकर्ते निःशब्द

Plane Fire Video : थोडक्यात बचावले नासाचे वैमानिक! लँडिंगदरम्यान विमानाला लागली आग, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT