Shevaya can cause problems in Zilla Parishad 
अहिल्यानगर

कुरडया, शेवयांमुळे जिल्हा परिषदेला धोका

दौलत झावरे

नगर ः जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मालाची विक्री होईल या हेतून नेहमीच विक्रेते येत आहे. सध्या शेवया, कुरडया विक्रीसाठी काही महिला येत असून त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये येणारे विक्रेत्यांकडून मालाची खरेदी करीत आहेत. सध्या शेवया, पापड्या, कुरडया विक्री करणाऱ्यांचे येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यांच्याकडून पहिल्यांदा नोंदणी करून नंतर मालाचा पुरवठा केला जात आहे. या वस्तू तयार करणाऱ्यांनी सुरक्षितता पाळली का? वाहतूक करताना कोनाच्या संपर्कात वस्तू आल्यात नाहीत ना ? यासारखे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

काही विक्रेत्या महिलांनी दोन दिवसांपासून कुरडया व पापड्यासह इतर वस्तूंची नोंदणी करून घेतल्यानंतर माल घेऊन आत जिल्हा परिषदेत दाखल झाल्या होत्या. सुरवातीला त्यांनी माल जिल्हा परिषदेच्या बाहेर ठेऊन प्रवेशद्वारात तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून वरती जायची परवानगी घेतल्यानंतर त्या महिलेने पुन्हा गेटच्या बाहेर जाऊन मालाची पिशवी घेऊन जिल्हा परिषदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ही बाब चाणाक्ष सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धावत येत महिलेला जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यास मज्जाव केल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. 
 

आदेश एक अंमलबजावणी दुसरीच 
जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यगतांची नावे, फोन नंबर स्वतः लिहून घ्यावे, घेण्याचे आदेश सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिलेले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मनाने प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे नाव नंबर व सही लिहून देण्याचा आदेश असल्याचे सांगून अभ्यगतांची अडवणूक सुरु केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले! भारतात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा ताजे रेट

SCROLL FOR NEXT