In shevgaon taluka thieves have looted lakhs 
अहिल्यानगर

शेवगाव तालुक्‍यात चोऱ्यांचे सत्र सुरूच

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्‍यात गेल्या पाच दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. दहिगाव-ने, भावीनिमगाव येथे दिवसा घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याचे समोर येत असतानाच शिंगोरी, एरंडगाव येथे रात्रीचा डल्ला मारत चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. मागील तीन दिवसांत 10 ठिकाणी चोऱ्या, तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
एरंडगाव भागवत येथे शुक्रवारी (ता.13) रात्री गोकुळ शेषेराव भागवत यांच्या घरातून चोरांनी 8 हजार रुपये लंपास केले. एकनाथ भागवत यांच्या शर्टच्या खिशातून चार हजार रुपये, रंजीत सुभाष जाधव यांची शेळी पळविली. गोकुळ भागवत यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला. शिंगोरी येथील आबासाहेब यशवंत खंडागळे यांच्या घरात रविवारी पहाटे प्रवेश करीत चोरांनी त्यांच्यासह पत्नीला जबर मारहाण केली. नंतर कपाटातील साडे सात हजार रुपये, 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र असा 37 हजार 500 रुपयांचा ऐवजी लांबविला. खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
दहिगाव-ने येथील गोटीराम यशवंत काळे रविवारी कामानिमित्त बाहेर गेले असताना, दुपारी चोरांनी घरात प्रवेश केला. तेथून सोन्याचे तीन तोळ्याचे दागिने, 45 हजार रुपये असा 1 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास केला. भावीनिमगाव येथील मनोहर कोंडीराम भापकर यांच्या घरातून रविवारी दुपारी चोरांनी चार तोळ्याचे दागिने व 25 हजार रुपये असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT