shevgaon Forces working to create divisions in society Ambadas Danve politics sakal
अहिल्यानगर

Ambadas Danve : समाजात तेढ निर्माण करणारी शक्ती कार्यरत; अंबादास दानवे

आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करणारी शक्ती महाराष्ट्रात सध्या कार्यरत

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करणारी शक्ती महाराष्ट्रात सध्या कार्यरत आहे. या शक्तीला सरकारी पाठबळ असण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

अशा प्रकारच्या दंगलीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्ती राज्यात असल्याने दंगलीच्या घटना राज्यात कमी अधिक प्रमाणात सुरु आहेत. अवैध धंद्यांना संरक्षण दिल्यामुळेच ही दादागिरी व मस्ती राज्यात वाढली आहे. असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (ता. २०) शेवगाव येथे भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी ते व्यावसायिक व नागरिकांशी बोलत होते. यावेळी नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती अरुण पाटील लांडे, सहसंपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, संजय कोळगे, रामदास गोल्हार, अँड. विष्णुपंत पवार, अविनाश मगरे, एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे, शीतल पुरनाळे, उदय गांगुर्डे आदी उपस्थित होते.

आजअखेर ४८ जणांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी आज आणखी चार जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या ४८ झाली आहे. उर्वरित आरोपींची पोलिसांमार्फत शोधमोहीम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी बरोबरी करू शकत नाही, विक्रम मोडणं दूरच''; सरन्यायाधीशांनी कुणाचं केलं कौतुक?

"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Latest Marathi News Live Update: पहलगाम हल्ल्याचा धाक दाखवत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ८२ वर्षीय आजींना ७३.३० लाखांचा गंडा

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

SCROLL FOR NEXT