shivshanakr rajale esakal
अहिल्यानगर

पालिकेच्या ‘त्या’ ठेक्याचे पैसे कोणाच्या घशात?

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी (जि.अहमदनगर) : बाजार समितीच्या मागील सोळा वर्षांच्या व नगरपालिकेच्या पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याकडे जाऊन पुरावे देणार आहोत. भगवानगड (bhagwangad) पाणीयोजनेचे पितळ उघडे पडल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आमदार मोनिका राजळे ( mla monica rajale) ॲड. प्रताप ढाकणे यांच्यावर आरोप करीत आहेत. पालिकेच्या स्वच्छतेच्या ठेक्याचे पैसे कोणाच्या घशात जातात, याची चौकशी झाली पहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे व नगरसेवक बंडू बोरुडे यांनी केली आहे.

शिवशंकर राजळे यांचा सवाल; उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे देणार

राष्ट्रवादीच्या कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की भगवानगड पाणीयोजनेचे गाजर दाखवून मते घेतली. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यावर आमदार राजळे यांनी लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. २०१४ पासून २०१९ पर्यंत राज्यात व केंद्रात तुमचे सरकार होते, तेव्हा पाणीयोजना मंजूर का झाली नाही? खेर्डे येथे कार्यक्रमात तुमच्या टक्केवारी वसुली कार्यकर्त्याने ६२ भूखंड दिल्याचा बाजार समितीवर आरोप केला. ७४ पैकी सहा भूखंड आम्ही वाटप केले. बाकी भूखंडांचे श्रीखंड कोणी खाल्ले आहे? पंचायत समितीच्या रोजगार हमीच्या विहिरीचे पैसे कोणी घेतले आहेत? नगरपालिकेचा कारभार कसा आहे, हे जनतेने पाहिले आहे. पालिकेत अल्लीबाबा आणि चाळीस चोर अशी अवस्था झाली आहे. जॉगिंग पार्कमधे साठ रुपये लॉन टाकण्यासाठी दिले, तिथे गवताची काडीदेखील नाही. जॉगिंग पार्कची जागा जेवढी उताऱ्यावर आहे, तेवढे काम झालेले नाही.

औरंगाबादच्या ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका कोणी दिला? पालिकेतील किती नगरसेवक ठेकेदारी करतात, याचे उत्तर द्या. नगरसेवकांच्या सोयीसाठी पालिकेचा कामाचा आराखडा बनविला जातो व ‘सब मिलके खाओ’ ही संस्कृती रुजली आहे. चाळीस लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविले, ते महिनाभरात बंद कसे पडले? बाजार समितीच्या व पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अजित पवारांकडे जाऊन पुरावे देऊ, असा इशारा शिवशंकर राजळे, नगसेवक बंडू बोरुडे, चाँद मणियार, सविता भापकर, सविता डोमकावळे, बन्सी आठरे, वैभव दहिफळे, योगेश रासने, सीताराम बोरुडे, माधुरी आंधळे, बाळासाहेब घुले यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT