Shooting over space dispute, one killed on the spot
Shooting over space dispute, one killed on the spot 
अहमदनगर

जागेच्या वादातून गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः तालुक्यातील निपाणी वाडगाव परिसरातील लाटे वस्ती येथे रात्री गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यु झाला. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आज रात्री आठ वाजण्याच्या सुमरास ही घटना घडली. साबळे याला उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात आणले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लोटीवस्ती येथेल वायकर व साळवे यांच्यात जागेवरू वाद होता. या कारणावरून त्यांच्यात आज सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तेथील काही तरुणांनी त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तेथे तैनात करण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT