Balasaheb Thorat, Rajendra Nagwade and Anuradha Nagwade
Balasaheb Thorat, Rajendra Nagwade and Anuradha Nagwade sakal
अहमदनगर

Shrigonda News : श्रीगोंद्यात राजेंद्र नागवडे यांची छुपी रणनीती विरोधकांसाठी ठरणार आव्हान

संजय काटे

श्रीगोंदे - तालुक्यात गेल्या काही वर्षात भाजप व राष्ट्र्रवादी यांच्यात राजकीय सत्तासंघर्ष आहे. आता मात्र काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा बाळसं धरले आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी चालवली असतानाच तालुक्यात सुरु केलेली छुपी रणनिती विरोधकांसाठी आव्हान ठरणार आहे.

तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे पक्षसंघटन नावालाच आहेत. पदाधिकारी निवडी अथवा शाखा उदघाटने झाल्याचे आठवतही नाही. याउलट आता काँग्रेसने त्यांचे संघटन जोरात सुरु केले आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सुरु केलेले राजकीय नियोजन असल्याचे बोलले जाते. त्यातच अनुराधा नागवडे, स्मितल वाबळे, प्रशांत दरेकर, राकेश पाचपुते, योगेश भोईटे, प्रशांत ओगले यांच्याकडे असणारी जिल्हा व प्रदेश कार्यकारणीतील पदे आल्याने पक्ष संघटनेत वेगळे चैतन्य दिसत आहे.

विधानसभेला तालुक्यात पुन्हा एकदा भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायाला मिळेल, असे वाटत असतानाच आता काँग्रेसची ज्या पध्दतीने जुळवणी सुरु आहे, ती पाहता काँग्रेस यंत्रणेत सगळ्यांनाच धोबीपछाड देवू शकते हा नवा अंदाज पुढे येतोय.

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे या विधानसभा लढणारच हे वारंवार पक्षाचे नेते सांगत आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्तेही तयारीत दिसत आहेत. विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने राजेंद्र नागवडे यांनी गेल्या काही दिवसात घेतलेले निर्णय सकारात्मक चर्चेत आले आहेत. घोड धरणाच्या पाण्यासाठी कुठलाच नेता पुढे येत नव्हता, त्यावेळी नागवडे यांनी घेतलेली ठोस भुमिका शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरली आहे.

तहसील कार्यालया समोरचे आंदोलन व त्यातील इशारे, नागवडे कारखाना सभेत केलेला ठराव या गोष्टी आणि त्यानंतर आवर्तन सोडण्याचा झालेला निर्णय हा नागवडे यांच्या संघर्षाच्या तयारीचा मुद्दा असल्याचे दिसते. दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे वलय आजही स्पष्टपणे जाणवते.

त्याचा फायदा नागवडे कुटुंबाला कायमच मिळणार ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. दिपक नागवडे यांची मोठी मदत निवडणूकीत होणार असल्याने आज नागवडे कुटुंब आज राजकीयदृष्ट्या उजवे वाटत आहे.

नागवडे यांची नवी उमेद ही आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहूल जगताप या दोघांसाठीही आव्हान देणारी आहे. या दोघांच्या दुसऱ्या फळीतील विरोधकांबाबत नागवडे यांची 'वेट अँण्ड वॉच'ची भुमिका बरेच काही सांगून जाते. त्यामुळे सध्या नागवडे यांची पडणारी राजकीय पावले ही रणनितीचा भाग असल्याचे जाणकार सांगतात.

बाळासाहेब थोरात यांचा भक्कम पाठिंबा....

नागवडे कुटुंबासोबत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कायमच भक्कम पाठींबा राहिला आहे. विधानसभेसाठी नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास ही जागा काँग्रेसला सुटणार की महाविकास आघाडीतील नेते नागवडे यांच्यासाठी वेगळे सत्तास्थान तयार करते का हे पाहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT