Shrigonda's two brothers passed the competitive examination 
अहिल्यानगर

याला म्हणतात भाऊभाऊ ः एक झाला उपजिल्हाधिकारी, तर दुसरा नायब तहसीलदार

संजय आ. काटे

श्रीगोंदे : मढेवडगाव या छोट्याशा गावातील अजय व नरेंद्र या दोन भावांना आज इतिहास रचला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात मढेवडगाव येथील अजय व नरेंद्र शिंदे या भावांनी यश मिळविले.

दत्तात्रेय शिंदे हे इंजिनिअर असले तरी पत्नी सुजाता यांच्यासोबत शेतीत काबाडकष्ट करुन त्यांनी मुलांना घडविले. मुलांच्या यशाने आई-वडीलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू मात्र थांबत नव्हते. एक मुलगा उपजिल्हाधिकारी तर दुसरा तहसीलदार झाला आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या स्पर्धा परिक्षेच्या निकालाकडे शिंदे कुटुंबाचे लक्ष लागून राहिले होते. आज तो निकाल आला आणि त्यांच्या घरासोबतच गावात जल्लोष झाला. या दोघा भावांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मढेवडगाव येथेच झाले.पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात घेतले. त्यांचे मामा सतीश पाटील यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अजय उपजिल्हाधिकारी तर नरेंद्र नायब तहसीलदार झाला.

दत्तात्रेय शिंदे हे इंजिनिअर असून शासकीय ठेकेदारी करतात. तर सुजाता शिंदे या गृहिणी असून 'सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठच्या त्या गटनेत्या राहिल्या आहेत. हे दोघेही दापंत्य शेतात कष्ट करुन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत होते. आज मुलंनी त्यांचे स्वप्न पुर्ण केल्याचे आनंदाश्रु डोळ्यात जाणवत होते.

सुजाता शिंदे म्हणाल्या, मुलांनी आमचे व गावचे स्वप्न साकार करण्यासाठी कष्टाची तयारी ठेवली होती. त्यांनी कुठले शिक्षण घ्यायचे याचे बंधन कधीच घातले नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडला आमची केवळ एकच इच्छा होती. त्यांनी घराचे व गावाचे नाव मोठे करावे. आमचा तिसरा मुलगा सुजय हाही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत अाहे. त्याची संधी यावेळी हुकली. मात्र, पुढच्या वेळी तोही यश मिळविल. 


आई व वडीलांनी आमच्यावर कधीच भविष्याच्या शिक्षणाची अट ठेवली नाही. पुण्यात मामांचे मार्गदर्शन मिळाले. दोघांनी एकत्रीतच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. भाऊ म्हटले की भांडणे आलीच मात्र आमची मात्र परिक्षेत यश मिळविण्यासाठी स्पर्धा झाली. आणि त्यात दोघेही यशस्वी झालो. 
- अजय व नरेंद्र शिंदे , स्पर्धा परीक्षेतील यशस्वी बंधू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli RTO : वाहनधारकांना नाही शिस्त; ‘आरटीओ’ची वसुलीवर भिस्त; गतवर्षी २५ हजार कारवाया; ५ कोटी रुपयांची दंड वसुली

Viral News : प्राणी पाळत असाल तर सावधान ! कुत्र्याशी फक्त एक मिनिट खेळली महिला, नंतर अन् हात अ्न पाय कापावे लागले, नेमकं काय घडलं ?

Sanju Samson Struggle Story: बंदे में है दम...! संजू सॅमसन, आपला माणूस अन् त्याच्या पाठी खंबीर उभी राहणारी चारुलथा...

Vishwajit Kadam : राज्यातील प्रश्नांवर सरकारला जाग कधी?; आमदार विश्वजित कदम : विधानसभा अधिवेशनात सरकारला धारेवर धरले

Latest Marathi News Live Update : खामेनेई यांच्या हत्येविरोधात काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशीही निदर्शने

SCROLL FOR NEXT