The Shrirampur municipality has issued notices to traders in the city to take the corona vaccine 
अहिल्यानगर

पालिकेच्या नोटीसाविरुद्ध याचिका दाखल

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) :  येथील नगरपालिकेने शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोटीसा काढल्या. परंतु लस घेण्यासाठी शहरात सुविधा नसल्यामुळे व्यापारी प्रकाश गदिया यांनी याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्यात मिनी लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांनी लस घेण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटीस पाठविल्या. परंतू नगरपालिकेने लसीकरणासाठी अद्याप कुठलीही सुविधा उभी केलेली नाही. त्यामुळे प्रारंभी शहरात मोफत लसीकरण केंद्र सुरु करावे. व्यापाऱ्यांना लस घेण्याची सुविधा नसतांना पालिकेने थेट नोटिसा पाठविल्याने व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

नगरपालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे व्यापारी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे व्यापारी गदिया यांनी याचिकेत म्हटले आहे. न्यायालयात गदिया याचे काम अॅड. मजहर जहागीरदार, अॅड. तुषार चौदांते, अॅड. सौरभ गदिया पाहत आहे. कोरोनाच्या संकटात नगरपालिकेने लसीकरण सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. लस घेण्यासाठी कुठलीही सुविधा न देता थेट व्यापाऱ्यांना नोटीसा पाठविणे चुकीचे आहे. नगरपालिकेने तात्काळ लसीकरण केंद्र उभारुन व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

Ashok Kharat भोंदुगिरीतून जमवली ५०० कोटींची मालमत्ता, नाशिकमध्ये ७० एकर जमीन; नातलगांच्या नावावरही संपत्ती

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

MSRTC News: तोट्यातील एसटीला दिलासा; डिझेल खरेदीतून २४१ कोटींची बचत

SCROLL FOR NEXT