मंत्रीमंडळात बैठक  ई सकाळ
अहिल्यानगर

नेवाशात सहा आरोग्य केंद्रांना मंत्री टोपेंचा हिरवा कंदील

प्रा. सुनील गर्जे

नेवासे : तालुक्‍यातील सहा उपकेंद्रांना लवकरच मंजुरी देण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हिरवा कंदील दाखविला आहे. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना त्यांनी आरोग्य संचालकांना दिल्या आहेत, अशी माहिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. (Six new health centers in Nevasa taluka)

गडाख यांची नुकतीच आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी मंत्रालयात बैठक झाली. आरोग्य सेवा संचालक साधना तायडे, सहसंचालक डॉ. कांदेवाड, सहसचिव रामास्वामी उपस्थित होते. यावेळी भेंडे आरोग्य केंद्राबाबत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. माका येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत टोपे यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. माका, घोगरगाव, नेवासे बुद्रुक, टोका येथे उपकेंद्रे मिळण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

तालुक्‍यातील महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना तत्काळ अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध होण्यासाठी ट्रॉमा सेंटरची, तसेच कुकाणे व सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन होऊन ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणीही मंत्री गडाख यांनी यावेळी केली.

या बाबत आरोग्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. मोरे चिंचोरे, तामसवाडी येथील आरोग्य केंद्रांसाठीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नेवासे तालुक्‍यातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या दुरुस्तीस निधी उपलब्ध करण्यासाठी मंत्री गडाखांनी केलेल्या मागणीबाबत मंत्री टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले आहे.

सकारात्मक चर्चा

नगर जिल्ह्यासह नेवासे तालुक्‍यातील आरोग्य सेवेसंदर्भात आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठकीत झाली. तीत सकारात्मक अनेक निर्णय झाले. त्याचे दृश्‍य परिमाण लवकरच दिसतील.

- शंकरराव गडाख, जलसंधारणमंत्री

(Six new health centers in Nevasa taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT