Sixteen hundred and fifty corona patients in Rahuri 
अहिल्यानगर

राहुरीत तीन महिन्यांत तब्बल साडेसोळाशे कोरोना रूग्ण

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्‍यातील 96पैकी 74 गावांमध्ये 1641 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांपैकी 1394 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 24 गावांमधील 41 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तालुक्‍यात सध्या 27 गावांमध्ये 206 बाधित रुग्ण आहेत. कृषी विद्यापीठ येथे कोविड केअर सेंटरमध्ये 87, राहुरी फॅक्‍टरी येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये 4, जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी दवाखान्यांत 115 रुग्ण उपचार घेत आहेत. 

देशभरात 22 मार्चनंतर 76 दिवस लॉकडाउन झाले. नंतर लॉकडाउन मागे घेताना पहिल्या टप्प्यात प्रवासावरील निर्बंध शिथिल झाले. ई-पास घेऊन प्रवास सुरू झाला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. एक जुलै रोजी तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. जुलैअखेर रुग्णसंख्या 73 झाली. ऑगस्टमध्ये रोज एका गावात बाधित सापडू लागले. ऑगस्टमध्ये तालुक्‍यात 273 कोरोनाबाधित झाले. 

तालुक्‍यात एक सप्टेंबरपासून रॅपिड चाचण्या सुरू झाल्या आणि जुलैच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या वीस पट वाढली. मागील 28 दिवसात 1368 नवे रुग्ण आढळले. आता रुग्णसंख्या 1641वर पोचली. पंधरा दिवसांपूर्वी तालुक्‍यात सलग तीन दिवस रोज 90 ते 100 रुग्ण आढळले. 

शहरातील खासगी दवाखान्यांतील महागडे उपचार गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे देवळाली प्रवरा येथे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने खासगी डॉक्‍टरांच्या सहकार्यातून 50 खाटांचे रुग्णालय सुरू झाले.

शासनाने निर्धारित केलेल्या दराच्या निम्म्या दरात उपचाराची व्यवस्था झाली. राहुरी येथे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने 70 खाटांच्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: नववर्षाच्या जल्लोषासाठी मुंबई लोकल सज्ज! मध्यरात्री धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

Year End 2025: भारत-पाकिस्तान हस्तांदोलन प्रकरण ते स्मृती मानधनाच्या आयुष्यात आलेलं वादळ; या वर्षातील ५ चर्चेत राहिलेल्या घटना

Kolhapur Crime : लोंबकळणारा मृतदेह पाहून 'ती' घरी आली, नंतर लोकांनी सांगितलं 'तुझ्याच पोरानं घेतलाय गळफास...' आईला कळताचं...; कोल्हापुरातील घटना

Sangli Election : सांगलीवाडीत उमेदवारीचा पेच; महाविकास आघाडीत ताण, ऐनवेळी बदलांची शक्यता

आग लागली की लावली? सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईमध्ये भीषण वणवा; झाडं, प्राण्यांची राख, नेटकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT