In Solapur district a mistake was made by Talathi regarding land registration
In Solapur district a mistake was made by Talathi regarding land registration 
अहमदनगर

दोन एकर शेती हरवली; तलाठ्याची चूक? दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला करावी लागणार कोर्टवारी

अशोक मुरुमकर

अहदनगर : आपण एका चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचे पाहिले. हे वास्तव घडू शकेल का? चित्रपट पाहताना असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. मात्र, कागदी घोडे नाचवण्याच्या नादात सरकारी बाबूंकडून झालेल्या चुकीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना किती मनस्ताप होत असेल याची साधी त्यांना कल्पनाही त्यांना होऊ शकत नाही.

सोलापूर जिल्ह्यात असाच प्रकार एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे. त्याने जमीन विकली. मात्र, तलाठ्याने त्याच्या सातबारा उताऱ्यातून ते क्षेत्र कमी केलेच नाही.
सोलापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने गट नंबर ५ मधील त्याच्या हिस्स्यासील ०.८१ आर क्षेत्र एकाला विकले. गट नंबर ५ हा ३.८० हेक्टरचा आहे. दीपक व प्रशांत (नाव बदललेली) यांना वडीलांच्या निधनानंतर वारस हक्काने हे क्षेत्र आले. त्यांच्यात समान हिस्से झाले. त्यामुळे दीपकला १.९० व प्रशांत यांना १.९० हेक्टर क्षेत्र आले. गावातील पंचाच्या समोर ही वाटणी झाली होती. त्यानंतर काही कालावधीत दीपक यांनी त्यांच्या हिस्स्याचे ०.८१ आर क्षेत्र गजेंद्र यांना घरगुती कारणासाठी विकले. याचे खरेदीखत झाले. त्यांचे नावही सातबारा उताऱ्यावर आले.

त्यानंतर दीपक यांच्या १.९० हेक्टर क्षेत्रातून ०.८१ आर क्षेत्र कमी होणे गरजेचे होते. मात्र हे क्षेत्र कमी न होता. दीपक व प्रशांत यांच्या दोघांच्याही नावाववर १.९० असे सारखेच क्षेत्र राहिले. दरम्यान गजेंद्र यांनी काही दिवसानंतर ०.८१ आर जमीन पुन्हा दीपक यांचा मुलगा सौरभ व प्रशांत यांना विकले. यातील ०.२१ आर हे प्रशांत यांनी तर ०.६० आर क्षेत्र घेतले. हा प्रकार लक्षात आल्यांनंतर प्रशांत यांनी रितसर तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार देऊन हा प्रकार लक्षात आणून दिला. 

दीपक यांनी हे क्षेत्र कमी व्हावे म्हणून त्यावेळचे तलाठी यांना रितसर अर्ज सादर केला होता. मात्र, त्यांनी याकडे दूर्लक्ष केले. त्यामुळे तलाठ्याने त्यावेळी केलेली एक चूक अजूनही तशीच कागदावर आहे. ही दूरुस्त कशी होणार असा प्रश्‍न संबंधित शेतकऱ्यांना पडला आहे. संबंधित तलाठी आता हयात देखील नाहीत, असं दीपक हे सांगत आहेत. सध्या या दोन्ही कुटुंबाचे व्यस्थित सुरु आहे. मात्र, जर भविष्यात सौरभ आणि प्रशांत यांनी गजेंद्र यांना आमचे ०.८१ आर क्षेत्र द्यावे अशी मागणी केली तर कसं मिळणार असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

VIDEO: बाप तसा लेक! गोविंदाच्या मुलाच्या जबरदस्त डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT