Some of the five dams in the Kukdi catchment area have low water levels 
अहिल्यानगर

कुकडी पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी काही धरणात पाणी कमीच

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्‍यातील शेतकरी समाधानी आहे. त्यातच धरणांमध्येही पाणीसाठा चांगला असल्याने शेतकरी उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही अशा मनस्थितीत आहे.

मात्र, कुकडी प्रकल्पातील दोन धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने उन्हाळी हंगामात कुकडीसह घोड धरणातून किती व कधी आवर्तने देणार याची निश्‍चित माहिती जलसंपदा विभागाने जाहीर करावी, अशी मागणी कुकडी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली. 

म्हस्के यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन पाठविले. म्हस्के यांच्या म्हणण्यानूसार, पावसाळा चांगला झाल्याने शेतकरी पिके घेतात. त्यातच उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नसल्याची त्यांना शास्वती वाटत असल्याने यंदाच्या उन्हाळी हंगामातही शेतं हिरवी राहतील या पध्दतीचे नियोजन करीत आहे. 

समजलेल्या माहितीनूसार कुकडी प्रकल्पातील पाचपैकी काही धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा कमी असून त्याचा फटका उन्हाळ्यात पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्‍यातील लाभधारकांना बसू शकतो. तसे असल्यास शेतकऱ्यांना आजच त्याबाबत माहिती द्यावी लागेल व त्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यातील आवर्तन नियोजन जाहीर केले पाहिजे. त्यानूसार लाभधारक शेतीचे नियोजन करतील. 

म्हस्के म्हणाले की, कुकडी कालवा व वितरीकांवर असणारे अनाधिकृत पाईप काढण्याची मोहिम मध्यंतरी जलसंपदा विभागाने राबवली. मात्र, अनेक ठिकाणी पोटचाऱ्यांचे पाईपही काढले आहेत. ते तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहेत. तसे न झाल्यास पायथ्याचा शेतकरी पाण्यावाचून राहण्याची भिती आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT