A son has been killed by his father in Akhegaon 
अहिल्यानगर

हृदयद्रावक घटना : दारुड्या वडिलांकडून आखेगावात मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव (अहमदनगर) : घरगुती कारणातून झालेल्या वादातून जन्मदात्या बापाने आपल्या तरुण मुलाचा जीव घेतला. दारू पिऊन रागाच्या भरात लोखंडी गजाने केलेली मारहाण मुलाच्या जिवावर बेतली. आखेगाव (ता. शेवगाव) येथे मंगळवारी पहाटे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

चांदबीबी महाल परिसरात पुन्हा आढळला बिबट्या; गावांमध्ये भीतीचे वातावरण
 
सोमनाथ गोरख करपे (वय 18) असे मृताचे नाव आहे. गोरख किसन करपे आरोपी पित्याचे नाव असून, मुलाची आई ताराबाई यांनी याबाबत फिर्याद दिली. तिथे म्हटले आहे, की पतीला दारूचे व्यसन असल्याने तो घरी येऊन आम्हाला नेहमीच शिवीगाळ व मारहाण करत असे. त्यातून कायम किरकोळ वाद होतात. सोमवारी सायंकाळी शेतातून काम करून घरी आले तेव्हा पती व मुलगा घरीच होते. पती दारू पिऊन आला. 'तुम्ही सणासुदीच्या दिवशी दारू पिऊन का आलात,' असे विचारले असता ते मारण्यासाठी पुढे आले. 

मात्र, मुलगामध्ये पडला. त्याचा राग मनात धरून मंगळवारी पहाटे मुलगा सोमनाथच्या डोक्‍यात लोखंडी गजाने मारहाण केली. त्याचा ओरडल्याचा आवाज आल्याने तिकडे पळत गेले. तेथे पती गोरख हातातील लोखंडी गजाने सोमनाथच्या डोक्‍यावर मारत होता. गंभीर जखमी झाल्याने मुलगा काहीच बोलत नव्हता. मला पाहताच पती गोरख तिथून निघून गेला. दरम्यान, शेजारच्यांनी सोमनाथला मोटारीतून शेवगाव येथे खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याने त्यास नगरला हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT