crime esakal
अहिल्यानगर

साडूंची सासुरवाडीत करामत! सासऱ्यावर बलामत

सकाळ डिजिटल टीम

राहुरी (जि.अहमदनगर) : दोन साडू सासऱ्याच्या घरी पाहुणचाराला आले. पण सासुरवाडीत त्यांनी अशी काही करामत केली की सासऱ्याला स्वत:चं डोकं झोडून घेण्याची वेळ आली. साडूंच्या या करामतीने सासऱ्यावर बलामत आली. काय घडले नेमके? (son-in-laws-theft-crime-marathi-news-jpd93)

घटनेची माहिती अशी -

दोन साडू सासऱ्याच्या घरी पाहुणचाराला आले. मध्यरात्री त्यांनी सासुरवाडीतील दोन दुचाकी चोरल्या. एका दुचाकीच्या चोरीचा गुन्हा दाखल झाला. सासऱ्याच्या घरातून पोलिसांनी आरोपी साडूभाऊंना ताब्यात घेत दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या. साडूंच्या या करामतीने सासऱ्यावर बलामत आली. वांबोरी येथे बुधवारी (ता. २१) मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर लावलेल्या दोन दुचाकींची चोरी झाली. प्रसाद प्रदीप धावडे (रा. वांबोरी) यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता. २२) दुचाकीचोरीचाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना संशयित कात्रड येथे असल्याची माहिती मिळाली. गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना सासऱ्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींनी वांबोरी-राहुरी रस्त्यावर, वांबोरीपासून तीन किलोमीटर अंतरावर एका खडी क्रशरजवळ झाडाखाली लपवून ठेवलेल्या दुचाकी पोलिसांना दिल्या. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, हवालदार दिनकर चव्हाण, संतोषकुमार राठोड, पोलिस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी वेगवान तपासाद्वारे केली.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

बाबासाहेब कारभारी भालेराव (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासे) व साहेबराव ऊर्फ गोरख कारभारी साठे (वय ३३, रा. ब्राह्मणी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुरी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT