BJP esakal
अहिल्यानगर

अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली नाईकवाडी

सकाळ वृत्तसेवा

अकोले (जि. अहमदनगर) : अकोले नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायत सभागृहात पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजपचे (Bjp) 12 तर विरोधी राष्ट्रवादी (NCP) शिवसेना (Shivsena) आघाडीचे 4 असे 16 नगरसेवक सभेला उपस्थित होते. भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांना 12 मते पडली. तर नवनाथ शेटे यांना 4 मते मिळाली. काँग्रेसचे एकमेव नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी नगराध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी विजयी झाल्याचे घोषित केले.

उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज

उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले आहेत. माजी मंत्री मधुकरराव पिचड, भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराम डेरे यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भात नगरसेवकांची वैयक्तिक मते जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांच्या नावाची घोषणा केली.

त्यानंतर नगरपंचायतमध्ये येऊन माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे, जि. प. अर्थ व बांध. समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, जे. डी. आंबरे, अॅड. वसंतराव मनकर, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, बाजार समितीचे माजी सभापती सुधाकर देशमुख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेटे, आर पी आयचे अध्यक्ष शांताराम संगारे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सरोदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब वडजे यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. वैष्णवी धुमाळ हे त्यांचे सूचक तर सागर चौधरी हे अनुमोदक आहेत. अकोले नगरपंचायतचे प्रशासक, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या प्रशासक पदाचा पदभार सोडला व नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचेकडे नगरपंचायतची सूत्रे बहाल केली.

नेत्यांनी धरला डिजेच्या तालावर ठेका

नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षाच्या निवडी घोषित होताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करीत या निवडीचे स्वागत करण्यात आले. नूतन पदाधिकारी व नगरसेवक- नगरसेविका यांची विजयी रथातून शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ठीक- ठिकाणी नूतन पदाधिकारी व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आदींनी मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला.

या बैठकीस नगरसेवक सागर चौधरी, प्रतिभा मनकर, हितेश कुंभार, शितल वैद्य, वैष्णवी धुमाळ, जनाबाई मोहिते, तमन्ना शेख, शरद नवले, कविता शेळके, विरोधी नवनाथ शेटे, आरिफ शेख, श्वेताली रुपवते, विमल मंडलिक, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT