Sowing on so many lakh hectares in Nagar district 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यात इतक्‍या लाख हेक्‍टरवर पेरणी 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः मृग नक्षत्रात जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला असून, जिल्ह्यात एक लाख 23 हजार 700 हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यातच हवामान खात्याने यंदा दमदार पावसाचे संकेत दिल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. 

कोरोनाच्या संकटाने मागील तीन महिन्यांपासून जनजीवन विस्कळित झाले. कोरोनामुळे निर्माण झालेले निराशेचे वातावरण यंदा मुहूर्तावर बरसू लागलेल्या मृगधारांनी हटविले आहे. मागील आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शिवारात खरिपाच्या पेरणीचा उत्सव सुरू आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळातही शेतशिवारामध्ये खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू होती. जिल्हा प्रशासनाकडून खरीप हंगामाचे नियोजन कोरोनाच्या काळातदेखील दक्षतेने करण्यात आले. 

जिल्ह्यात 1 व 3 जूनला रोहिणी नक्षत्राचा पाऊस झाला. त्यानंतर 7 जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्राने पहिले तीन दिवस विसावा घेतला. मात्र, मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात बरसातीचा उत्सव मांडला. 17 जूनच्या अवधीपर्यंत जिल्ह्यातील नऊ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. मृगाचा पाऊस हा खरीप हंगामासाठी महत्त्वाचा मानला जातो. शेतशिवारात पाऊस झाल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीने वेग घेतला. कृषी विभागाने खते, बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात 15 पथके नेमली आहेत. 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशानुसार खरीप हंगामात खते, बियाणे यांची अडचण होणार नाही, याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एक लाख 23 हजार 700 हेक्‍टर क्षेत्रावर खरिपातील भात, बाजरी, तूर, उडीद, मूग, कपाशी, मका या पिकांची पेरणी झाली. यंदा कृषी विभागाच्या अंदाजानुसार सरासरी चार लाख 79 हजार हेक्‍टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभाग तत्पर आहे. 
- विलास नलगे, कृषी उपसंचालक 

जिल्ह्यात झालेली पेरणी 
बाजरी-30 हजार 
मका-दोन हजार 
तूर-नऊ हजार 
मूग-25 हजार 
उडीद-सहा हजार 
सोयाबीन-15 हजार 
कापूस-33 हजार 
(हेक्‍टर) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे, पाच नवीन पोलिस ठाणी मंजूर!

IND vs SA: बुमराहपाठोपाठ हार्दिकचीही खास सेंच्युरी! 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय ऑलराऊंडर

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

SCROLL FOR NEXT