Congres  sakal
अहिल्यानगर

श्रीगोंदे नगरपालिकेत काँग्रेसमध्ये फूट

पाच नगरसेवकांचा वेगळ्या गटाचा प्रस्ताव,जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

सकाळ डिजिटल टीम

श्रीगोंदे : साडेतीन वर्षांपुर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या एकत्रीत गटनोंदणीला आज तडा गेला. काँग्रेसचे शहराध्यक्ष व गटनेते मनोहर पोटे यांच्याविरोधात बंडाचे निशान फडकवित काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. यावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार असले तरी पालिकेत काँग्रेस फूटल्याचे दिसते.

गणेश भोस, संतोष कोथिंबिरे, निसार बेपारी, सीमा गोरे व सोनाली घोडके या नगरसेवकांनी सध्याचे गटनेते पोटे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करीत स्वतंत्र गटाला मान्यता द्यावी असे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यावर आता जिल्हाधिकारी पुढचा निर्णय घेतील. या पाच नगरसेवकांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, की फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या गटाच्या सभेत आम्ही सर्व सदस्यांनी बहुमताने मनोहर रामदास पोटे यांची गटनेतेपदी नेमणूक केली.

सदस्यांना एकत्रित घेऊन पोटे यांनी शहराच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी व गटाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणीसाठी करणे अपेक्षित होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून संबंधित गटनेते गटातील सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत. कोणतेही निर्णय बहुमताने घेतले जात नाहीत. गटविरोधी कारवाया केल्या जात असून याबाबत गटनेत्यांवर वैयक्तिक तक्रार अर्ज व याचिका दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी गटनेतेपदी राहणे हे बहुमताच्या विरुद्ध आहे.याबाबत स्वतंत्र तात्काळ मीटिंग बोलवले नंतर संबंधित गटनेते सदर मिटींगला मुद्दाम गैरहजर राहिले त्यामुळे मीटिंगमध्ये गटनेता बदलाबाबत बहुमताने सोबत जोडलेल्या निर्णय घेण्यात आला. आमचे गटाचे गटनेतेपदी गणेश बाबासाहेब भोस यांची नेमणूक करण्यात आली आहे.

घटनात्मक पेच होणार

पाच नगरसेवकांनी बहुमताने गट नोंदणी केली असली तरी यात घटनात्मक पेच आहे. गटनोंदणी करताना केलेल्या घटनेत गटाची बैठक बोलाविण्याचा अधिकार केवळ गटनेत्यांना असल्याचे समजले. तसे असले तर या पाच नगरसेवकांनी सचिवामार्फत बोलावलेली बैठक अवैध ठरेल व त्यांचा गटनेता बदलाचा प्रस्तावही बारगळेल. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी जर या पार्श्वभुमिवर पोटे यांनाच पुन्हा गटनेता ठेवले तर या पाच नगरसेवकांविरुध्द पक्षशिस्तभंग केल्याचा ठपकाही पोटे ठेवू शकतात.

गणेश भोस यांच्या प्रभागात साडेतीन वर्षात सर्वाधिक चार कोटींचा निधी नगराध्यक्षांनी दिला. तुलनेत इतर नगरसेवकांना कमी निधी दिला. या नगरसेवकांच्या वेगळ्याच अपेक्षा असल्याने त्या पुर्ण करु शकत नव्हतो. शहराच्या विकासाला प्राधान्य देत आहे.

- मनोहर पोटे, गटनेते काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT