ST and AMT will run in Nagar district 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यात आजपासून धावणार एसटी आणि एएमटी

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसला प्रशासनाने ब्रेक दिला होता. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यामुळे आता दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होत आहे. 32 बसच्या 166 फेऱ्यांचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस प्रवाशांना घेऊन जिल्ह्यात धावली नव्हती. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार बससेवा सुरू करण्यात येत आहे. एसटी प्रशासनाकडून जिल्ह्यातील 11 आगारांच्या माध्यमातून 44 बसच्या 227 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, संगमनेर शहर हॉट स्पॉट असल्यामुळे तेथील अकरा बसच्या माध्यमातून होणाऱ्या 52 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आता दहा आगारांतून 32 बसच्या 166 फेऱ्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी 65 चालक व 65 वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागनियंत्रक विजय गिते यांनी दिली. 

आज दुपारपासून एएमटीही धावणार 

महापालिकेची शहर बस सेवा शुक्रवारी दुपारपासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यासाठीची तयारी महापालिका प्रशासन व दीपाली ट्रान्सपोर्टचे संचालक प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता शहरातील जनजीवन उद्यापासून शुक्रवारी सुरळीत होण्याची शक्यता आहे, हे पाहता महापालिका प्रशासनाने शहर बस सेवा सुरू करण्याच्या हालचाली आज प्रशासकीय पातळीवर केल्या महापालिका प्रशासनाने दीपाली ट्रान्सपोर्टला शहर बस सेवा सुरू करण्यास सांगितले. मात्र, दीपाली ट्रान्सपोर्टमधील शहर बससेवेचे चालक-वाहक लॉकडाऊनमुळे काम बंद करून घरी अथवा गावी गेले आहेत. त्यांनापुन्हा कामावर हजर करण्यासाठीच्या हालचाली आज दीपाली ट्रान्सपोर्ट कडून सुरू होत्या. उद्या दुपारनंतर टप्प्याटप्प्याने मागणीनुसार शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. एमआयडीसीमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी शहर बस वाहतूक सेवा सुरूच होती. आता उर्वरित ठिकाणी मागणीनुसार उद्यापासून शहर बस सेवा सुरू होईल, अशी माहिती प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT