Akshay Kumar has shared a romantic post on Twinkle Khanna's birthday 
अहिल्यानगर

जिल्हा परिषद कागदोपत्री सतर्क; भंडाऱ्याच्या घटनेनंतर पळापळ, फायर ऑडिटसाठी जुळवाजुळव

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : भंडाऱ्यातील आगीच्या घटनेची राज्यात कोठे पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्य सरकारने गंभीर पावले उचलली असून, आरोग्य यंत्रणेला फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून, आतापर्यंतच्या फायर ऑडिटच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र, ऑडिट फक्त कागदोपत्रीच सुरू आहे. जिल्हा परिषदेमधील आगप्रतिबंधक उपकरणे धूळ खात पडून आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये आगीच्या प्रतिबंधासाठी कायमस्वरूपी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावर वीजपंप बसवून सर्वच विभागांमध्ये कापडी पाइपलाइन केली आहे. आगप्रतिबंधक उपकरणे सर्वच विभागांमध्ये ठेवली आहेत. मंत्रालयाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर सर्व उपकरणे अद्ययावत करण्यात आली होती. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. मात्र, त्यानंतर उपकरणांकडे दुर्लक्ष झाले.

आगप्रतिबंधासाठी प्रत्येक मजल्यावर ठेवलेल्या वाळूच्या बादल्या गायब झाल्या. आगप्रतिबंधक यंत्रे जिल्हा परिषदेत किती आहेत? त्यांची मुदत कधी संपली, याची आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. दरम्यान, जिल्हा परिषद इमारतीतील वायरिंग 16 वर्षे जुनी असून, गत आठवड्यात प्रवेशद्वाराजवळ शॉर्ट सर्किट झाले होते. एका मजल्यावर पाणीगळती सुरू आहे. त्यामुळे आणखी धोका वाढला आहे. 

कोरोना संकटात मुख्य इमारतीची तीन प्रवेशद्वारे व आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी असलेले दोन जिने बंद ठेवण्यात आले आहेत. ते खुले करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

जिल्हा परिषदेत फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करून घेण्यात यावे. ऑडिट झाल्यानंतर येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. 
- जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

जिल्हा रुग्णालयात 113 आणि दोन उपजिल्हा रुग्णालये व 23 ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी पाच आगप्रतिबंधक, अशी एकूण 238 यंत्रे आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या संकटात नव्याने 50 यंत्रे घेण्यात आली होती. या सर्वांचे ऑडिट केले जाणार असून, जिल्हा रुग्णालयातील यंत्रांचे ऑडिट मंगळवारी  महापालिकेच्या अग्निशामक पथकाकडून केले जाणार आहे. 
- डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT