The state government has launched the Mahawas Abhiyan Yojana 
अहिल्यानगर

घरकुलांच्या जागेचा तिढा सुटला; नगर जिल्ह्यात महाआवास अभियानास वेग,  223 घरांना जागा उपलब्ध

दौलत झावरे

अहमदनगर : राज्यातील घरकुलांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महाआवास अभियान योजना सुरू केली. या अभियानातून 100 दिवसांत घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य जिल्हा परिषदांना दिले आहे. त्यात जिल्ह्यातील 223 घरकुलांचा जागेअभावी तिढा निर्माण झाला होता. सर्व घरकुलांना जागा उपलब्ध झाल्याने लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजनांमधून घरकुले दिली जात आहेत. प्रत्येक तालुक्‍यासह जिल्ह्याला त्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात नगर जिल्ह्यासाठी 54 हजार 181 घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यातील 41 हजार 395 घरकुलांना मंजुरी दिली असून, उर्वरित 9448 लाभार्थींना स्वमालकीची जागा नसल्याने त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. या सर्वांना जागा उपलब्ध करून देणे, तसेच अतिक्रमणे नियमांत करून देण्याचा कार्यक्रम महाआवास अभियानात राज्य सरकारने हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1778 लाभार्थींना जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यात काहींची अतिक्रमणे नियमात करून, तसेच काहींना 99 वर्षांच्या करार व बक्षिसपत्र खरेदी करून दिली आहेत. 

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गेल्या 15 दिवसांत 233 प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यात 160 गावठाण क्षेत्रात झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली. गावठाण क्षेत्रातील 60 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. गावठाण क्षेत्रात पूनर्वसन करण्यासाठी भूखंड मंजुरीसाठी दाखल झालेले तीन प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आले. नेवासे, श्रीरामपूर, राहाता, श्रीगोंदे, संगमनेर व पारनेर तालुक्‍यातील हे सर्व प्रस्ताव आहेत. घरकुलांच्या जागेसंदर्भात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे दाखल झाल्यानंतर त्यावर 8 दिवसांत कार्यवाही करून मंजुरी घेतली जाते. जानेवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत दाखल झालेले 223 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 

महाआवास योजनेतून घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अभियानात गावठाणातील अतिक्रमणे नियमानुकूल करणे, गावठाण क्षेत्रात घरकुलांना जागा उपलब्ध करून देणे, गावठाण क्षेत्रात पुनर्वसन करणे, यासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव दाखल होत आहेत. आज अखेर 223 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. 
- निखीलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Updates : पंढरपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

Solapur News: 'विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा'; गुरुपौर्णिमेला दोन शिष्यांची गुरूला अनोखी दक्षिणा

SCROLL FOR NEXT