Prajakta Tanpure Sakal
अहिल्यानगर

वीज मंडळाची भरती कधी? ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की..

पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : "राज्य वीज मंडळाच्या महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ. उच्चशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊ. विद्युत सहायक पदाच्या रखडलेल्या भरती प्रक्रियेतील अडचणींवर मार्ग काढला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल,’’ असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.


राहुरी येथे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. प्रधान ऊर्जासचिव तथा सीएमडी (महापारेषण) दिनेश वाघमारे, प्रादेशिक संचालक (कोकण) प्रसाद रेशमे, संघटनेचे अध्यक्ष नागोराव मगर, सरचिटणीस जहिरोद्दीन सय्यद, नाशिक येथील मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, माणिक गुट्टे, राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार उपस्थित होते.


तनपुरे म्हणाले, ‘‘वीज कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दीड वर्षात स्वतःचा जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत ठेवला. त्यामुळे राज्यात अंधार झाला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जा राज्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे, वीज मंडळाच्या समस्या समजल्या. राज्य सरकारने कृषी विषयक ऊर्जा धोरण राबविल्याने शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत मिळाली. वीजबिल वसुलीतून नवीन रोहित्रे, वीज उपकेंद्रे देऊन ऊर्जा विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यास मदत झाली.’’


‘‘महावितरण कंपनीत कर्मचारी संख्या कमी असल्याने ग्राहकांना सेवा देण्यास मर्यादा येतात. कर्मचाऱ्यांवरील ताण हलका करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागेल. जेथे जास्त वसुली, तेथे मनुष्यबळ वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. शेवटच्या ग्राहकांशी संवाद साधणारा कर्मचारी कंपनीचा चेहरा आहे. त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.’’ वीजबिल वसुली प्रसंगी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने संवाद साधावा. त्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने मार्ग काढला जाईल, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात दहा ठिकाणी वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवणे व नवीन वीज उपकेंद्र निर्मितीच्या कामास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अखंडित, सुरळीत वीजपुरवठा होऊन ग्राहकांच्या तक्रारी दूर होतील.
प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १७ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: कृषी विभागाच्या १३ हजार कर्मचाऱ्यांना लॅपटॉप

SCROLL FOR NEXT