stock market down trade bse sensex ahmedngar sakal
अहिल्यानगर

Russia Ukraine War : गुंतवणूकदार धडाम्‌! अहमदनगर जिल्ह्यात मोठे नुकसान

मुरलीधर कराळे

अहमदनगर : रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर झाला आहे. गुंतवणूकदारांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे. आज सकाळपासून बहुतेक कंपन्यांचे शेअर वेगात खाली आले. नगर जिल्ह्यातून अंदाजे १२०० कोटींची गुंतवणूक या बाजारात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. साधारणपणे १० ते १५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, तसेच नोकरदार यांच्याकडून शेअर बाजारामध्ये विशेष गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यांची एकत्रित आकडेवारी उपलब्ध नसली, तरी हा आकडा हजार कोटींवर जातो. गेल्या महिनाभरापासून फॉरेन मार्केटमधील गुंतवणूकदारांनी शेअरविक्रीचा सपाटा लावला होता. क्रूड तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक महागाई, रशिया-युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ही स्थिती उद्‌भवली आहे. आज युद्ध सुरू झाल्याच्या बातम्या येताच सर्वच शेअर कोसळू लागले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील गुंतवणूकदार धास्तावले. साधारणपणे दहा टक्क्यांपर्यंत प्रत्येकाचा पोर्टफोलिओ घसरला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

युद्धाने उद््‌भवलेली परिस्थिती

  • २०१४ मध्ये युक्रेन व रशियात युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही शेअर मार्केट धडाम्‌ कोसळले होते.

  • १९९२ मध्ये अरब देशांत युद्धजन्य स्थिती होती. त्यावेळीही गुंतवणूकदारांचा मोठा तोटा झाला.

  • अमेरिका-इराण, भारत-पाकिस्तान (कारगिल) या युद्धांच्या वेळीही शेअर बाजार कोसळला होता.

घसरलेले शेअर (टक्केवारी)

  • रिलायन्स १२

  • एशियन पेन्ट्‌स १५

  • एसबीआय १३

  • गोदरेज २७

  • हिंदुस्थान लिव्हर ११

  • ब्रिटानिया ९

  • एचडीएफसी १०

  • कोटक बॅंक ९

  • टाटा मोटर्स १९

युद्धाची बातमी येताच शेअर बाजार घसरू लागला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे दहा ते १५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. गेल्या महिनाभरापासून जागतिक महागाई, युद्धजन्य परिस्थिती आदींमुळे शेअरबाजारात मोठ्या घडामोडी होत आहेत. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्याने जिल्ह्यातील गुंतवणूकदार धास्तावला आहे. या मार्केटमध्ये हीच स्थिती कायम राहत नसते. पंधरा दिवसांत सुधारू शकते. त्यामुळे ‘फंडामेंटली स्ट्रॉंग’ गुंतवणूकदारांना कमी किमतीत शेअर्स खरेदी करण्याची ही संधी आहे.

- संजय मोरे,शेअर मार्केट तज्ज्ञ

वाढती महागाई, कच्च्या तेलाचे व कमोडिटीचे फुगलेले भाव, यांमुळे होणारी संभाव्य नाणेटंचाई ही भारतीय बाजारांसाठी प्रमुख आव्हान असणार आहे. सेन्सेक्ससाठी ५२५००, तर निफ्टीसाठी १५८०० हे स्तर सपोर्ट आहेत.

- शैलेश गांधी,शेअर मार्केट तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT