Strangling the death of that girl 
अहिल्यानगर

वेगळं वळण ः या कारणाने झाला त्या चिमुरडीचा मृत्यू.... त्या खोलीत कोणकोण होतं...

सुनील गर्जे

नेवासे : तालुक्यातील सौंदाळे येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय ९ ) या अल्पवयीन मुलीचा उत्तरीय तपासणी अहवाल नेवासे पोलिसांना प्राप्त झाला अाहे. त्यामुळे तिच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. तिचा मृत्यू हा अनैसर्गिक आहे. 

या प्रकरणी नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वैष्णवीचा खूनी कोण व तिच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल परिसरात उपस्थित होत आहे. मात्र, पोलिसांना त्याचे धागेदोरे लागले आहेत.  

पोलिस हेड कॉन्स्टेबल भीमराज पवार यांनी नेवासे पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी “रविवार (ता. २१) रोजी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकार्या ने दिलेल्या खबरीवरुन मयत वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय-9, रा.सौंदाळे,  ता.नेवासे हीस उपचारसाठी रुग्णालयात आणले होते. मात्र, ती उपचारपूर्वी मयत झाली. यावरून नेवासे पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. 
मात्र, मयत मुलीचा चुलता कानिफनाथ विठ्ठल आरगडे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या संबंधित वैद्यकीय अधिकार्यांना वैष्णवीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे सांगितले.

गळा दाबून खून झाल्याचा अंदाज

यावरून प्राथमिक तपासणीत वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. या बाबत नेवासे पोलिसांनाही कळविण्यात आले. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजीत डेरे, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते हे ग्रामीण रुग्णालायत गेले. त्यांनी पंचनामा करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. उत्तरीय तपासणीत वैष्णवीचा मृत्यू हा तिचा मृत्यू हा छातीवर दाब टाकुन श्वासोच्छावास बंद पडुन झाल्याचा अहवाल आला. या अहवालावरून नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

'भाचा' पोलिसांच्या रडारवरच !
घटना झाल्यापासून पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेत महत्वाचा संशयित पोलिसांनी मयत वैष्णवीच्या आई-वडील व बहिणीसह 'भाचा' ताब्यात घेतले होते. पोलिसांनी चौकशीनंतर आज सोमवारी इतरांना सोडले. मात्र, 'भाचा' चौकशीसाठी थांबवून धरला. पोलिसी खाक्या दाखवूनही हा 'भाचा' सराईतांसारखा या प्रकरणी 'मिठाची गुळणी' धरूनच आहे. त्यामुळे पोलिसांच्या 'रडार'वर 'भाचा' आहे. तोच या प्रकरणातील सूत्रधार निघण्याची चर्चा आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाळी काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे हे विशेष प्रयत्न करत अाहेत. ते सौंदाळे येथे ठाण मांडून आहेत.  

तरीही खुनाचे गूढ कायमच?

शनिवारी (ता. २०) रात्री घरी वैष्णवी, तिची बहीण (वय १५) व त्यांच्याकडे शिक्षणासाठी असलेला ‘भाचा’ (वय २५) हेच तिघे एका खोलीत झोपले होते. मात्र, भाचा आपण पटांगणात झोपल्याचे सांगतो तर वैष्णवीच्या मृत्यूबाबत आपल्याला काहीच माहीत नाही असे बहीण पोलिसांना चौकशीत सांगते. खोलीत फक्त वैष्णवी व तिची बहीण दोघीच होत्या. त्या खोलीला आतून कडी लावल्यास बाहेरच्या व्यक्तीला हात घालून व प्रयत्न करूनही कडी उघडत नाही. याचा अनुभव खुद्द जिल्हा पोलिस प्रमुखांनी घेतला. त्यातच तिच्या आई-वडिलांनी तिच्या अंत्यविधीसाठी केलेली घाई व नंतर सर्पदंशाचा मृत्यू झाल्याचा केलेला दावा हे खटकते आहे.

"वैष्णवी आरगडे मृत्यू प्रकरणी नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्ति विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील खर्‍या आरोपीचा शोध लवकरच घेतला जाईल.
-मंदार जवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव, अहमदनगर.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT