gram panchayat
gram panchayat esakal
अहमदनगर

राजूर ग्रामपंचायतची अवस्था 'आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या'

शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील सर्वांत मोठी पेसा ग्रामपंचायत असलेल्या राजूर ग्रामपंचायतीची करवसुली समाधानकारक होत नसल्याने, ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्‍थांनी कर भरून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक दिनकर बंड यांनी ग्रामसभेत केले.

जिल्हा परिषदेने कामातून हात काढले

राजूर येथील विठ्ठल मंदिरात पार पडलेल्या ग्रामसभेत ते बोलत होते. कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर प्रथमच ग्रामसभा झाली. तिला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंड म्हणाले, की ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतल्यावर दोनच महिन्यांत, कारभार चालवणे तारेवरची कसरत असल्याचे लक्षात आले. पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाची मोठी थकबाकी आहे. त्यातच जिल्हा परिषदेने पथदिव्यांच्या कामातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अडचणीत आली आहे. परिसरातील इतरही ग्रामपंचायतींची हीच स्थिती आहे.

विकासकामांना पैसा आणायचा कुठून?

राजूर ग्रामपंचायतीची थकबाकी ३० लाखांच्या आसपास आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, वारंवार पाणीपुरवठा योजनेत होणारा बिघाड, दर महिन्याला येणारे पाच ते सहा लाख रुपये पाणीपुरवठ्याचे वीजबिल व घटलेली करवसुली, यामुळे विकासकामांना पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न आहे. ग्रामस्थांनी थकबाकी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन बंड यांनी केले. राजू लहामगे यांच्यासह ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. ग्रामविकास अधिकारी बी. डी. नाडेकर यांनी त्यावर उत्तरे दिली.


दारूबंदी उठवण्याची मागणी

राजूरमध्ये मागील पंधरा वर्षांपासून दारूबंदी आहे. मात्र, तरीही चढ्या दराने अवैध दारूविक्री सुरू आहे. दारू पिणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अधिकृत चार दुकाने बंद होऊन अनधिकृत अनेक अड्डे सुरू झाले आहेत. त्यामुळे दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी यावेळी आप्पा पाचपुते यांनी केली.
उपसभापती दत्ता देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच काशिनाथ भडांगे, बाळासाहेब लहामगे, अरुण माळवे, शेखर वालझाडे, भास्कर येलमामे, दत्ता जगदाळे, गौरव माळवे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT