Students and villagers of Chhatrapati Shivaji Vidyalaya in Ghogargaon will take to the streets as highway mrityunjay doot 
अहिल्यानगर

'मृत्युंजय दूत' करणार वाहनचालकांचे प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे (अहमदनगर) : नगर-सोलापूर महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. हे अपघात कमी करण्यासाठी व चालकांत जनजागृती करण्यासाठी घोगरगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थ 'हायवे मृत्युंजय दूत' म्हणून रस्त्यावर उतरणार आहेत.

महापालिकेचे 685 कोटीचे अंदाजपत्रक 'स्थायी' समोर सादर
 
घोगरगाव येथे महामार्ग पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. यात प्रामुख्याने अपघात होवू न देणे, झाल्यास प्रथमोचार काय करावेत, अपघातग्रस्तांना कसे हाताळावे, याचे त्यांनी मार्गदर्शन केले. अपघात कमी करण्यासाठी व वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी हायवे मृत्युंजय दूत म्हणून पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

त्यास छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. या दूतांना लवकरच ओळखपत्र दिले जाणार आहे. सहायक फौजदार रमेश कुलांगे, शकील शेख, कपिल राजापुरे, सूर्यभान झेंडे, अभिमन्यू घनवट, पोलिस पाटील सुदाम बोरुडे, प्राचार्य अविनाश गांगर्डे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT