The sugar mills had plotted to finish me off
The sugar mills had plotted to finish me off 
अहमदनगर

मला संपवण्याचा डाव होता, भाजपच्या कर्डिलेंनी सांगितली निवडणुकीतील आतली गोष्ट

सकाळ वृत्तसेवा

नगर - जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजप पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पक्षाच्या वतीने निवडणूकीची जबाबदारी माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माझ्यावर दिली होती त्यानंतर मी माजी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन बँक बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. ही बँक जुनेजाणते, ज्येष्ठ नेत्यांनी उभी केली, असे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.

या ठिकाणी पक्षीय राजकारण नको अशी भूमिका मांडल्यानंतर त्यांनीसुद्धा पाठिंबा दिल्यानंतर खासदार सुजय विखे, माजी मंत्री
राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब यांच्याशी संपर्क केला. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर दोन्ही बाजूंनी बिनविरोध निवडणूकीसांठी तयार झाले. त्यानंतर सर्व साखर कारखानदार व प्रास्तापिक पुढाऱ्यांनी आपआपल्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. त्यांनी निवडी बिनविरोध करून घेतल्या पण माजी जागा बिनविरोध होऊ नये यासाठी काही पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक लादली. निवडणूक लादली याच्याशी माझी तक्रार नाही. लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेले. मोठ्या मतधिक्याने जिल्हा बँकेचा संचालक होणार, असे कर्डिले म्हणाले.
जिल्हा सहकारी बँकेच्या मतदानाच्या दिवशी मतदारांचे आभार मानित असताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य माधवराव लामखडे, पै. संभाजी लोढे, विष्णू खांदवे, सुरेश शिंदे, बलभीम शेळके, दत्ता पाटील शेळके, विलास शिदें, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाश घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, वसंत सोनवणे, रेवण चोभे, अशोक झरेकर, नारायण आव्हाड, शिवाजी कार्ले, बन्सी कराळे, संजय ढोणे, अमोल गाडे, मनेष साठे, दिलीप
भालसिंग, दत्ता तापकिरे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेळके माझ्याविरोधात नको म्हणाले..

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, नगर तालुका सोसायटी संघातून उमेदवारी करीत असतांना माझ्या विरोधात यांना उमेदवार मिळत नव्हता. माजी खासदार दादापाटील शेळके यांचे चिंरजीव रावसाहेब पाटील शेळके यांना उमेदवारीसाठी आग्रह करत होते. परंतु त्यांनी त्यांना नकार देऊन सांगितले की, शिवाजीराव कर्डिले हे शेतकऱ्यांचे प्रश्न बँकेत मांडतात. माझे वडील त्यांच्या विरोधात असतांनाही माझ्या वडिलांचे नाव नगर तालुका बाजार समितीला देण्याचे काम केले. उमेदवार मिळत नसतांना क वर्गातील उमेदवाराला उभे राहता येत नव्हते तरी सहकार मंत्र्याकडून दबाव आणून हा उमेदवार उभा केला. माझ्याकडे कुठलेही पद नसतांना व सरकारचा दबाव असतांनाही तालुक्याची जनता माझ्यापाठीमागे उभी राहिल्यामुळे माझा विजय होणार आहे. जिल्हा बँकेची ओळख ही कारखानदारांपुरती मर्यादित होती. 

मदत केली म्हणून वाईट

गेल्या पंधरा वर्षांत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन गेलो व शेतकऱ्यांना केंद्र व राज्यांच्या योजना समजावून मिळून देण्याच काम केले. पूर्वी जिल्हा बँकेचा वार्षिक होणाऱ्या नफ्याचे वाटप कारखानदार वाटून घ्यायचे. परंतु ते काम मी बंद केले. आता शेतकऱ्यांपर्यंतही नफ्याचे वाटप होऊ लागले. कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये केंद्र व राज्य सरकारने मदतीचा हात दिला. जिल्हा बँकेनेही शेतकऱ्यांना मदत करावी. यासाठी मी जिरायत भागातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जवाटप केले.

मी हलगर्जीपणामुळे आमदारकी घालवली

नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सुमारे दीडशे कोटीचे वाटप केल्यामुळे कारखानदार व प्रस्तापित नाराज झाले. ते जागे होऊन कर्डिले हे संचालक पदावर दिसता कामा नये, यासाठी त्यांनी माझ्या विरोधात काम करण्यास सुरूवात केली. जिल्हा बँकेत मी त्यांना अडसर ठरतो म्हणून मला संपवण्याचा डाव गेली पंचवीस वर्षांपासून करतात. मागील आमदारकीच्या निवडणूकीमध्ये माझी हलगर्जीपणा व दुर्लेक्षामुळे माझा पराभव झाला. राजकारणात मला संघर्षाशिवाय कुठहीली गोष्ट मिळाली नाही. माझ्याकडे आता आमदारकी नाही. साखर कारखाना नाही. कॉलेज नाही, तरीही जनता माझ्यापाठीमागे आहे.

आता कारखानदारांच्या कर्जालाही विरोध करणार

जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिरायत भागाची शेतकऱ्यांची उतराई करणार. जिरायत भागाला जर बँकेतून कर्ज दिल्यानंतर लबाड व चोर ठरवत असतील तर यापुढे कारखानदारांना कर्ज देतांनाही विरोध केला जाईल. कारखानदारांना दोन दोन, तीन
तीन कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले जाते, मग शेतकऱ्यांना १०० कोटी रूपये दिले तर काय बिघडले? शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी या कारखानदारांच्या
विरोधात संघर्ष करणार.

पुढील निवडणुका जनतेच्या बळावर लढणार

पुढील काळात सर्व निवडणुका जनतेच्या पाठबळावर ताकदीनिशी लढवणार आहे. जिल्हा परिषद व बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे यश मिळवणार आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबासाहेब खर्से यांनी केले व आभार प्रदर्शन सुरेश शिंदे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT