अहिल्यानगर

कोरोनातही उस उत्पादकांच्या तोंडात साखर 

सकाळ वृत्तसेवा


श्रीगोंदे,  : मागील हंगामात बंद राहिलेल्या साखर कारखान्यांची धुराडी यंदा मात्र जोरात पेटणार आहेत. त्यादृष्टीने कारखान्यांची तयारी सुरू आहे. तालुक्‍यात वीस लाख टनांपेक्षा जास्त ऊस उभा आहे. मात्र, कोरोना संकटामुळे कारखान्यांकडे येणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची अडचण किती होते, याची भीती असली, तरी कारखान्यांना हार्वेस्टरचा पर्याय ठेवावा लागेल. 


गेल्या गळीत हंगामात अपेक्षित ऊस नसल्याने नागवडे, कुकडी व दोन्ही साईकृपा कारखाने बंद ठेवण्याची नामुष्की कारखाना प्रशासनावर आली. त्याचा फटका अर्थातच कारखानदारी व शेतकरी अशा दोघांनाही बसला. यंदा मात्र ही स्थिती राहणार नसून, तालुक्‍यात वीस लाख टनांपेक्षा जास्त ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे कारखान्यांनी यंत्रसामग्रीची दुरुस्ती, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदार यांची जुळवणी सुरू केली आहे. 

दाच्या गळीत हंगामात कोरोनाची दहशत किती राहते, यावर हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे. कारण, ऊसतोडणी मजुरांवर गळिताची मोठी जबाबदारी राहते. कोरोनामुळे त्यांची संख्या घटली तर कारखान्यांना हार्वेस्टर यंत्राचा पर्याय जास्त प्रमाणात स्वीकारावा लागेल.

त्यातच तालुक्‍यातील कारखान्यांना ऊसतोडणी मजूर व वाहतूकदार यांना दर वर्षी पन्नास कोटी रुपयांची उचल द्यावी लागते. यंदा कोरोनामुळे ऊसतोडणी मजूर येण्याचे प्रमाण 25 टक्के कमी राहण्याची भीती आहे.

 
तालुक्‍यात यंदा साधारणपणे वीस लाख टनांवर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा सगळेच कारखाने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. त्यातच नागवडे, कुकडी व देवदैठण येथील साईकृपा कारखान्याने हंगामाची तयारी सुरू केली आहे. 

नागवडे कारखाना कार्यक्षेत्रात दहा लाख टन ऊस आहे. नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊसतोडणीसाठी मजुरांसह हार्वेस्टर यंत्रांचा पर्याय ठेवलेला आहे. यंदाचा हंगाम चांगला होईल. 
- रमाकांत नाईक, कार्यकारी संचालक, शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना 

-कुकडी कारखान्याने नऊ लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कार्यक्षेत्रासोबतच बाहेरून ऊस आणण्यासाठी करार सुरू आहेत. पाऊस व "कुकडी'चे पाणी आले, तर एकरी उत्पादन वाढून तालुक्‍यात सगळ्या कारखान्यांना पंचवीस लाख टन ऊस मिळेल. 
- दत्तात्रेय मरकड, कार्यकारी संचालक, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी कारखाना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

नवी मुंबईत गॅस वितरण ठप्प, 1500हून अधिक कमर्शियल सिलिंडर पुरवठा बंद; हॉटेल व्यावसायिक अडचणीत

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

SCROLL FOR NEXT