अहमदनगर : भार सोसेना अन् लगामही लागेना sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : भार सोसेना अन् लगामही लागेना

ट्रॅक्टरसह ट्रॉली नदीत उलटल्या; जीवघेण्या वाहतुकीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर (बोधेगाव) : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील काठपाडी नदीपुलावरून ऊसवाहतूक करणारा डबल ट्रॉली ट्रॅक्टर, समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने नदीपात्रात कोसळला. ही घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून बाहेर उडी घेतल्याने चालक थोडक्यात बचावला. मात्र, धोकादायक वाहतुकीकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने सामान्यांचा जीव धोक्यात आला आहे.

शेवगाव-गेवराई मार्गावरून चापडगावमार्गे संत ज्ञानेश्वर साखर कारखान्यासाठी ऊस नेणाऱ्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरला, पुलावर समोरून भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने हुलकावणी दिली. पुलावरील धोकादायक खड्डे व समोरील वाहनाला वाचवताना, अतिरिक्त भारामुळे तोल जाऊन ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉली नदीपात्रात उलटल्या. सुदैवाने जीवितहानी टळली.

सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असल्याने रस्त्यावरून ऊसवाहतूक करणाऱ्या डबल ट्रॉली वाहनांमुळे इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या जीवघेण्या वाहतुकीकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

चालकांत हाणामारी

अपघाताच्या घटनेनंतर दोन्ही ट्रॅक्टरचालकांचे भांडण जुंपले. दोघांनीही आपापल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. नंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. अखेर ग्रामस्थांनी त्यांना पिटाळून लावले.

"ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर कर्णकर्कश आवाजात गाणी, क्षमतेपेक्षा अतिरिक्त उसाची वाहतूक, वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, रस्त्यांवरील खड्डे आदींमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन कार्यवाही केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल."

- बाबा पठाण, सामाजिक कार्यकर्ते, बोधेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT