अहिल्यानगर

गोड-धोड पंगतीशिवायच ऊसतोडणी कामगार माघारी

मुळा साखर कारखान्याच्या गट परिसरात ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने कोप्या करुन राहतात

विनायक दरंदले

यंदाच्या कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून सर्वांनी बाडबिस्तार आवरून घरी जाणे पसंत केले आहे.

सोनई (अहमदनगर) : दरवर्षी ऊसगळीत हंगाम (Sugarcane season) संपल्यानंतर ऊसतोडणी कामगारांत (Sugarcane workers) होणारी गोड जेवणाची पंगत यंदाच्या वर्षी कोरोनामुळे (Corona) झालीच नाही. पट्टा पडल्यानंतर सर्वांनीच लगबगीने घरचा रस्ता धरला आहे. (Sugarcane workers have returned home without a sweet meal)

मुळा साखर कारखान्याच्या गट परिसरात ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने कोप्या करुन राहतात. हंगाम काळात या भागाला एका गावाचेच स्वरूप येते. दरवर्षी संत वामनभाऊ पुण्यतिथी, होळी, रंगपंचमी हे सण सामुहिकपणे साजरे करुन आनंद लुटला जातो. हंगाम संपल्यानंतर दहा-वीस कुटुंब एकत्र येवून बुंदीचा स्वयंपाक करुन एकत्र जेवणाचा आनंद लुटत होते. मात्र यंदाच्या कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून सर्वांनी बाडबिस्तार आवरून घरी जाणे पसंत केले आहे.

यावर्षी कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून कारखाना यंत्रणेने एकाच ठिकाणी कोप्या लावण्यास परवानगी दिली नव्हती. कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून नेहमीची जागा मोकळीच ठेवण्यात आली होती. यामुळे यावर्षी ऊसतोडणी कामगार विभागून राहत होते. सायंकाळी गट परिसर गर्दीने बहरुन जात होता. असे असले तरी ऊसतोडणी कामगारात कोरोनाचा प्रभाव दिसलाच नाही.

मुळा कारखान्याचा एकशे ऐंशी दिवसाचा गळीत हंगाम संपल्यावर दोनच दिवस सर्व ऊसतोडणी कामगार चंबूगबाळ आवरून घरी गेले. ट्रक टॅम्पोमध्ये जनावरे, चारा व संसार उपयोगी साहित्य घेवून सर्व कामगार गावी गेले आहेत. घरातील काही सदस्य गावी असल्याने काळजी म्हणून लवकर जात असल्याचे वैजीनाथ व सुरेश अव्हाड (मठाचीवाडी) यांनी सांगितले. भर उन्हात ऊसतोडणी व वाहतूक करत असल्याने कोरोनाचा त्रास झाला नाही, असे दिलीप किर्तने व सुनिल डोके (पाथर्डी) यांनी सांगितले.

(Sugarcane workers have returned home without a sweet meal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT