Suicide of two members of the same family in Kopargaon 
अहिल्यानगर

खळबळजनक ः प्राध्यापक मुलाने घेतला गळफास...वडिलांनीही त्याच पहाटे उचललं हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी कारखाना परिसरात खळबळजनक घटना घडली. फड कुटुंबातील मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. ते पाहून हेलावलेल्या वडिलांनी त्याच पहाटे उचललं हे पाऊल. या घटनेने कोपरगाव तालुक्यात चर्चा सुरू आहे. 

राहुल संजय फड (27 )आणि संजय रंगनाथ फड( 50) अशी मृतांची नावे आहेत. या बाबत अधिक माहिती अशी, संजीवनी कारखाना परिसरात सदर फड कुटुंबातील राहुल याने रात्री एक वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला दोरी बांधून गळाफास घेऊन आत्महत्या केली. 

ही घटना पाहिल्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास वडील संजय फड यांनी ही  गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविलयाची धक्कादायक घटना घडली.

घरातील कुरबुरीमुळे बाप-लेकाने आत्महत्या केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मात्र, खरं कारण पोलीस तपासात पुढे येईल. संजय फडे यांचे कारखाना गेटसमोर हॉटेलचा व्यवसाय आहे.

राहुल हा शहरातील एका शिक्षण संस्थेत प्राध्यापक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT