Sujit Jhaware says, we do socialization not politics 
अहिल्यानगर

ऐकलं का...सुजित झावरे म्हणतात, आम्ही राजकारण नाही समाजकारण करतो

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : राजकारणामध्ये माणसामाणसामध्ये काही कारण नसताना कटुता निर्माण होते. गावागावात गट निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीदोष तयार होतो. म्हणून राजकारणापेक्षा समाजकारण केव्हाही चांगले, त्यास सातत्याने आम्ही प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.

खडकवाडी (ता.पारनेर) येथील जिल्हा परीषद लघुपाटबंधारे विभागातील सर्वात उंचीचा असणारा लेंडी ओढा बंधा-यातील पाण्याचे पूजन, गावठाण चौक व शाळा परीसर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, वाकचौरे दुकान ते गागरे गल्ली, भिल्ल वस्ती रस्ता सिमेंटीकरण करणे, बोरवाक शाळा शौचालय व पाणीपुरवठा वितरण योजना यांसह अन्य विकासकामांचा शुभारंभ झावरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अमोल साळवे, किसन धुमाळ, मोहन रोकडे, चिमाजी चिकणे, मारुती आग्रे उपस्थित होते. 

झावरे म्हणाले, या गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बंधारे समाजकल्याण विभागामार्फत रस्ते सिमेंटीकरण, स्टेट लाईट, वैयक्तिक लाभाच्या योजना, आदिवासी विभागामार्फत अनेक विकासकामे झाली. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Kolhapur District Bank Election : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, भय्या माने यांच्यासह दिग्गजांना धक्का; सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना सर्कीट बेंचचा दणका

Sindhudurg Farmer Compensation : e-KYC अपूर्ण असल्यास 4 कोटी 41 लाखांची नुकसानभरपाई अडकणार; सिंधुदुर्गातील 'या' 2,212 शेतकऱ्यांना मोठा फटका

Maharashtra Live News : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत

IPL 2027 Trade : एक मोठा खेळाडू Mumbai Indians च्या ताफ्यात येतोय? भविष्याचा कर्णधार म्हणून सक्षम पर्याय; आश्चर्यचकित करणारी Deal

SCROLL FOR NEXT