Swabhimani Shetkari Sanghatana aggressive for a lump sum FRP esakal
अहिल्यानगर

Ahmednagar | एक रकमी FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : राहुरी फॅक्टरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अचानक आक्रमक भूमिका घेतली. ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील कार्यालयाला कुलूप ठोकून, कर्मचाऱ्यांना कोंडून घेतले. कार्यालयातील एक फाईल व काही कागदपत्रे जाळून टाकण्यात आली.

जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करू देणार नाहीचा इशारा

"कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. एक रकमी एफआरपी (FRP) मिळालीच पाहिजे." अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील शेतकी कार्यालयात घुसले. कार्यालयातील एक फाईल व काही कागदपत्र घेऊन बाहेर आले. संगमनेर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून, रवींद्र मोरे यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर कारखान्याची फाईल व कागदपत्रे जाळून टाकली.

यावेळी बोलतांना मोरे म्हणाले, "सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली ऊसदराची कोंडी फुटली आहे. परंतु, नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी येत्या २०२१-२२ गाळप हंगामात शेतकऱ्यांना किती ऊस दर देणार? हे अद्याप जाहीर केलेले नाही. कारखान्यांचा गळीत हंगाम दिवाळी सणा नंतर सुरू होईल. राज्य सरकार मधील सत्ताधारी मंत्री असोत वा विरोधी पक्षनेते. ऊस दराची कोंडी फोडून, एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा करीत नाहीत. तोपर्यंत जिल्ह्यातील त्यांचे साखर कारखाने सुरू करू देणार नाही. त्यासाठी ठिकाणी तीव्र आंदोलने छेडली जातील."

आंदोलनाची मशाल प्रातिनिधिक स्वरूपात पेटविली

"संगमनेर कारखान्याने मागील वर्षी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलेला ऊस दर कार्यक्षेत्र बाहेरून आणलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला दिलेला नाही. त्यामुळे, संगमनेर कारखान्याच्या कार्यालयात घुसून, प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलनाची मशाल पेटविली आहे." - रवींद्र मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष.

मोरे यांच्यासह स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सतीश पवार, सुनील इंगळे, आनंद वने, सतीश पवळे, सचिन म्हसे, अरुण डौले, दिनेश वराळे, प्रमोद पवार, किशोर वराळे, हर्ष करपे, शुभम फसले, राहुल करपे, संदीप शिरसाठ आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Defamation Case : संजय राऊत मानहानी प्रकरणी नारायण राणेंवर खटला चालणार, 11 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी...नेमकं काय म्हणाले होते?

Mobile Launch : मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 17 पासून Galaxy S25 FE पर्यंत, पुढच्या महिन्यात लाँच होतायत 'हे' 5 सुपर स्मार्टफोन

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? तब्बल 26 लाख बहिणींची छाननी सुरू, बोगस लाभार्थींवर होणार कठोर कारवाई

Latest Maharashtra News Updates : रांजणगाव महागणपती येथे भाद्रपद महोत्सवाला सुरुवात

Nanded Honour Killing : पित्याने विवाहित मुलीसह प्रियकराचे हात बांधून विहिरीत फेकले; ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरले

SCROLL FOR NEXT