लस Media Gallery
अहिल्यानगर

लसीकरणासाठी शिक्षक परिषद करणार आत्मक्लेष

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : पुणे, औरंगाबाद, जालना, नाशिक आदी जिल्ह्यांत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांचेही लसीकरण झाले. मात्र, नगर जिल्ह्यात संघटनेने वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन याबाबत गंभीर नाही. शिक्षक परिषद यासाठी आत्मक्‍लेष आंदोलन करणार असल्याचे परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी सांगितले. (Teachers will hold a movement for vaccination)

"सकाळ'शी बोलताना ठुबे म्हणाले, ""प्राथमिक शिक्षकांना कोरोनासंबंधित विविध प्रकारच्या नियुक्‍त्या महसूल व आरोग्य विभागाकडून बजावण्यात आल्या आहेत. शासनाने कोविडसंबंधी कामे करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे "फ्रंटलाइन वर्कर' म्हणून प्राधान्याने लसीकरण केले आहे. मात्र, प्राथमिक शिक्षक कोविडसंबंधी कुटुंब सर्वेक्षण, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग, चेक पोस्ट, कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, डाटा एन्ट्री आदी ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका यांच्या बरोबरीने काम करीत असूनही, केवळ "फ्रंटलाइन वर्कर' म्हणून संबोधित न केल्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण होऊ शकले नाही.

या बाबत शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते मंगळवारी (ता. 18) एक दिवसाचे आत्मक्‍लेष व अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. कोविडसंदर्भातील वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचे आदेश प्रशासनाकडून बजावले जात आहेत. आजअखेर जिल्ह्यात 30 शिक्षक बांधवांना जीव गमवावा लागला आहे.

जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेपैकी कोणताही विभाग लसीकरणाशिवाय काम करीत नाही. घरोघरी जाऊन शिक्षक कुटुंब सर्वेक्षण करीत आहेत.'' आमच्या जिवाची तुम्हाला पर्वा नसेल, तर मग काम तरी कशाला देता, असा प्रश्न ठुबे यांनी विचारला आहे. विशेष मोहीम राबून शिक्षकांसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र एक दिवसाचे लसीकरण सत्र आयोजित करावे, असे ते म्हणाले.(Teachers will hold a movement for vaccination)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT