Tehsildars blew up boats in Bhima river with gelatin blast 
अहिल्यानगर

भीमा पात्रातील बोटी तहसीलदारांनी जिलेटीन स्फोटाने उडवल्या

दत्ता उकिरडे

राशीन : कर्जत व दौंड तालुक्‍यांच्या हद्दीचा फायदा घेत अनेक महिन्यांपासून भीमा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा सुरू होता. त्यावरील कारवाईसाठी दौंडचे तहसीलदार संजय पाटील व त्यांच्या पथकाने गुरुवारी (ता. 11) भीमा पात्रातील खेड (ता. कर्जत) हद्दीतील बोटी जिलेटिनच्या साहाय्याने उडविल्या. 

खेड हद्दीत पाच फायबर व एक सक्‍शन बोट, वाटलूज (ता. दौंड) हद्दीत तीन फायबर, दोन सक्‍शन, तसेच भांबोरे (ता. कर्जत) हद्दीतील दोन फायबर व एक सक्‍शन बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्‌ध्वस्त केल्या.

कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे हेही उपस्थित होते. या कारवाईत दौंडचे तहसीलदार संजय पाटील, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडलाधिकारी मंगेश नेवसे, तलाठी शशिकांत सोनवणे, दीपक पांढरपट्टे, दीपक आजबे, संतोष इडुळे, हरिश्‍चंद्र फरांदे, बालाजी जाधव, मनोज तेलंग यांनी सहभाग घेतला. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT