Ten years servitude for abusing a girl Ahmednagar 
अहिल्यानगर

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची सक्तमजुरी

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाना लक्ष्मण शिंदे (वय ३५, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी ठोठावली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

अहमदनगर शहरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी शिवणक्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. मात्र, संध्याकाळपर्यंत परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या पुतणीकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने पीडित मुलगी नाना शिंदेबरोबर प्रवीण भावड्या वाकळे (रा. सावेडी गाव) याच्या मदतीने निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडित मुलगी व नाना शिंदे यांना शिराळ चिचोंडी (पाथर्डी) येथे सोडल्याचे समजले. तेथून संबंधितांना ताब्यात घेतले. पीडितेच्या जबाबानुसार अत्याचार, तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३ व ४ प्रमाणे कलम लावले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, सहायक पोलिस निरीक्षक आर. एन. पिंगळे, पोलिस अंमलदार जी. ए. केदार यांनी करून न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी नाना शिंदे यास न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

हे साक्षीदार ठरले महत्त्वाचे

फिर्यादी, अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष, पीडितेची चुलत बहीण, साक्षीदार ड्रायव्हर, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तसेच पीडित मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविल्या. महिला अंमलदार उत्कर्षा वडते यांनी या खटल्यामध्ये पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT