file photo 
अहिल्यानगर

अंनिसने रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह

आनंद गायकवाड

तालुक्‍यातील तळेगाव दिघे भागातील कौठे कमळेश्‍वर येथील दहावीत शिकणाऱ्या अवघ्या 15 वर्षे वयाच्या एका मुलीचे गावातीलच एका व्यक्तीशी लग्न लावून देण्याचा घाट घातला गेला.

संगमनेर ः तालुक्‍यातील तळेगाव दिघे येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आले. समितीच्या राज्य सचिव ऍड. रंजना पगार-गवांदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत दोन्ही कुटुंबांचे प्रबोधन केले, तसेच मुलीच्या पित्याकडून हमीपत्र घेतले. (The Anti-Superstition Committee stopped the marriage of a minor girl)

तालुक्‍यातील तळेगाव दिघे भागातील कौठे कमळेश्‍वर येथील दहावीत शिकणाऱ्या अवघ्या 15 वर्षे वयाच्या एका मुलीचे गावातीलच एका व्यक्तीशी लग्न लावून देण्याचा घाट घातला गेला. शनिवारी (ता. 22) विवाह सोहळ्याचे आयोजनही केले होते. मात्र, एका व्यक्तीने ही खबर ऍड. गवांदे यांना दिली. त्यांनी तातडीने गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना याबाबत कल्पना दिली.

शिंदे यांनी ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिता मोरे यांना सोबत घेऊन गुरुवारी (ता. 20) वधूपित्याचे घर गाठले. दोन्ही कुटुंबांना एकत्र बसवून, अल्पवयीन वधू-वरांच्या विवाहाबाबतच्या कायदेशीर बाबींची व त्यामुळे दोघांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती देत त्यांचे प्रबोधन केले.

यावेळी मुलीच्या पालकांनी, याबाबत अज्ञानी असल्याने, चूक झाल्याचे सांगत मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह न करण्याबाबतचे लेखी हमीपत्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेने या प्रकरणावर पडदा पडला आहे.(The-Anti-Superstition-Committee-stopped-the-marriage-of-a-minor-girl)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT