Picasa
अहिल्यानगर

हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरूंची संख्या दीडपट वाढली

शांताराम काळे

अकोले : महाराष्ट्राचा प्राणी म्हणून शेकरूची ओळख आहे. हा देखणा प्राणी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे. परंतु या वर्षी या प्राण्याची संख्या दीडपट वाढली आहे. हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा वन्यजीव व राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्रात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये व अनिल अंजनकर, गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्रात महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु या वन्य प्राण्याची प्रगणना करण्यात आली. प्रगणनेसाठी संरक्षण मजूर, वनरक्षक वनपाल यांनी शेकरूचे घरटे (जुने, नवे) प्रत्यक्ष दिसलेले शेकरुनुसार प्रगणना करण्यात आली आहे.

हरिश्चंद्रगड अभयारण्यात ९७ शेकरू आढळले आहेत. यामुळे शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दीडपट वाढ झाल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगणतीनुसार स्पष्ट झाले. वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची ३९६ घरटी आढळली आहेत. मात्र, त्यांची संख्या ९७ असून कोथळे ४३, विहीर २०, लव्हाळी १७ ,पाचनई १४ , कुमशेत ३ शेकरू आहेत. ही संख्या वाढल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.(The number of shekars increased in Harishchandra Gad Sanctuary)

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात. या मुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली आहे. हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. त्यामुळे अंतिम आकडा हा जूनमध्ये मिळेल, असे वन विभागाचे मत आहे. ही गणना 'जीपीएस' या तंत्राद्वारे केली जाते. यंदा केलेल्या गणनेत शेकरूंचा आकडा वाढू शकतो, अशी आशा स. वनसरंक्षक गणेश रणदिवे यांनी व्यक्त केली. इतरत्र त्यांचा अधिवास आहे का, याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल डी. डी.पडवळ यांनी सांगितले.

काय आहेत वैशिष्ट्ये

वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजीसारखे लाल असतात. त्याला मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते. ते १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते.

महाराष्ट्रात भीमाशंकर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात. शेकरू हा अतिशय देखणा आहे. मात्र, तो झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्यांची संख्या वाढली आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक, शेपटी असलेल्या शेकरूंच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात..

कळसूबाई घाटघरमध्ये आधिवास

कोरोनामुळे शेकरूंची नोंद करण्याचे काम काही अंशी झाले आहे. हरिश्चंद्रगड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली ३९६ घरटी आढळली आहेत. एकूण ९७ शेकरू या परिसरात असून कळसूबाई घाटघर परिसरात १७ शेकरू आहेत. तेथेही ४३ घरटी आढळून आली. गतवर्षी प्राणी पक्षांसह अभयारण्य क्षेत्रात २८० प्राणी व ४५० पक्षी आढळल्याची माहिती वनाधिकारी पडवळ यांनी दिली.(The number of shekars increased in Harishchandra Gad Sanctuary)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT