led sakal
अहिल्यानगर

शहरातील एलईडीची लवकरच प्रक्रिया पूर्ण

आठ दिवसांत काम सुरू होणार ; सुमारे ३० हजार दिवे बसविणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरातील रस्त्यावरील खांबांवर एलईडी दिवा बसविण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज त्याबाबतची वर्क आॅर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून येत्या आठ दिवसांत दिवे बसविण्यास प्रारंभ होणार आहे. सुमारे २५ हजार दिवे शहरात बसविण्यात येतील, अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.

याबाबत आज महापालिकेत बैठक झाली. या वेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले तसेच अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरातील अनेक खांबांवर पथदिवे नाहीत. बल्ब खराब होणे, वायर तुटणे, दिवा फुटणे असे अनेक प्रकार घडून दिवे बंद झाले आहेत. उपनगरांमध्ये तर अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे चोऱ्यांच्या घटना घडत आहेत.

याबाबत महापालिकेच्या सभांमध्ये वादळी चर्चा झाली होती. महापालिकेचे सुमारे ३० हजार पथदिवे आहेत. त्यातील सुमारे २५ ते ३० टक्के दिवे कायम बंद असतात. त्याच्या देखभालीचा खर्चही मोठा असतो. याबाबत नागरिकांच्या कायम तक्रारी येतात. आता नव्याने एलईडी बसविण्यात येणार असल्याने संबंधित ठेकेदार कंपनीकडे देखभाल व दुरुस्ती आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात बचत होणार आहे. तसेच वीजबिलातही सुमारे १३ लाखांची बचत होणार आहे. दिवाळीपर्यंत बहुतेक भागात या दिव्यांचा लखलखाट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

Pune Tax Hike: निवडणूक झाली, आता पुणेकरांचा प्रॉपर्टी टॅक्स वाढणार! 'एवढ्या' करवाढीचा प्रस्ताव; 10 वर्षांपासून झाली नाही वाढ

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दुरुस्तीच्या कामामुळे 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गौरव

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

SCROLL FOR NEXT