ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : जिल्ह्याचे कामकाज ठप्प!

शिक्षक-कर्मचारी पुन्हा संपावर; समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्य सरकारने मागील संपात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता सहा महिन्यांत केली नाही. त्यामुळे सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. आजपासून बेमुदत संपाला प्रारंभ झाला. या पार्श्‍वभूमीवर सरकारी-निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, प्रा. सुनील पंडित, अप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडखे, राजेंद्र लांडे, भाऊसाहेब कचरे, डॉ. मुकुंद शिंदे, पी. डी. कोळपकर, विलास पेद्राम, भाऊसाहेब डमाळे, विजय काकडे, पुरुषोत्तम आडेप, संदीपान कासार, सुरेखा आंधळे, बी. एम. नवगण, सुरेश जेठे, देविदास पाडेकर आदींसह सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद व त्यांच्या संलग्न सर्व संघटना, महानगरपालिका, पंचायत समिती कर्मचारी, जुनी पेन्शन हक्क संघटना आदी सर्व संघटनांचे प्रतिनिधी व सदस्य सहभागी झाले होते.

रावसाहेब निमसे म्हणाले की, मागील संपात राज्य सरकारला सहकार्य करून आश्‍वासनावर संप मागे घेण्यात आला होता. मात्र, त्याची पूर्तता झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. या संपात जुनी पेन्शनचा हक्क घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष तळेकर यांनी कर्मचारी फसव्या आश्‍वासनांना बळी पडणार नसून, ठोस निर्णयासाठी सर्व कर्मचारी संपात उतरले आहेत. कोणत्याही परिणाम व कारवाईची भीती न बाळगता न्याय्य-हक्कांसाठी हा लढा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्षणचित्रे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्ता आंदोलकांच्या गर्दीने व्यापला होता.

आंदोलकांनी जुनी पेन्शन मागणीचे मजकूर लिहिलेले गांधी टोप्या घातल्या होत्या.

आंदोलनातील प्रमुख वक्त्यांनी भाषणात सरकारच्या कर्मचारी विरोधातील धोरणाचा निषेध केला.

शिक्षक बेमुदत संपावर

कुकाणे ः महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी गुरुवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत संप पुकारला. यावेळी नायब तहसीलदार किशोर सानप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष अशोक सोनवणे, शिक्षक सेनेचे सचिव उद्धव सोनवणे, रामलाल कर्डिले, नेवासे तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप रोडगे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

कुकाणे ः महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी गुरुवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत संप पुकारला. यावेळी नायब तहसीलदार किशोर सानप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष अशोक सोनवणे, शिक्षक सेनेचे सचिव उद्धव सोनवणे, रामलाल कर्डिले, नेवासे तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप रोडगे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

शिक्षकांचा तहसीलसमोर ठिय्या

पाथर्डी ः जुनी पेन्शन मिळावी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी आज गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार श्याम वाडकर यांना निवेदन दिले. या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले. त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वावर ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली. या वेळी आंदोलकांनी घोषणा दिल्या. आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक दौंड, मिथुन डोंगरे, कल्पाजित डोईफोडे, राजाराम नाकाडे, संजय घिगे, संगीता भापसे, चंद्रकांत खाडे, शरद मेढे, बाळासाहेब खेडकर, राजीव सुरवसे, सुरेश मिसाळ, सुभाष गव्हाणे, अजय भंडारी, समाधान आराख, महादेव दौंड, बाळासाहेब मरकड, गणेश खेडकर, बाळासाहेब घुले, विनोद ढाकणे, दिगंबर ढाकणे, सुभाष भागवत, अविनाश नेहुल, वंदना मोरगावकर, मनीषा मोरे, संध्या कुलकर्णी, आत्माराम दहिफळे, राजेंद्र खेडकर, सतीश भोसले, मच्छिंद्र आठरे, नीलेश फुंदे, अनिस शेख, असिफ पठाण हे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT