तर महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : ...तर महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन

अतिक्रमणे काढण्यासाठी मढेवडगावातील ग्रामस्थांचे ‘रास्ता रोको’

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : तालुक्यातील मढेवडगावातील पाणंद रस्ता व बाजारतळाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी प्रशासनाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने पारदर्शक मोजणी करून, तहसीलदारांनी अतिक्रमणे काढली नाहीत तर संगमनेर येथे महसूलमंत्र्यांच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा मढेवडगाव ग्रामस्थांनी दिला.

गावातील अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामस्थांनी नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सरपंच महानंदा मांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे व भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संदीप गोसावी यांनी अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. आश्वासनाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे म्हणाले, की राज्य सरकारने पाणंद रस्ते, शिव रस्ते व शेती रस्ते मोकळे करण्यासाठी विविध योजना आणल्या. प्रत्यक्षात महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या निष्क्रियतेमुळे या योजना कागदोपत्रीच दिसत आहेत.

सरपंच मांडे, अंबादास मांडे, गेना मांडे, साहेबराव उंडे, संदीप मांडे, राजेंद्र उंडे, राजेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, गणेश मांडे, अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, बापू बर्डे, काळूराम ससाणे, भगवान धावडे, वामन मांडे, प्रवीण वाबळे, बापू गाडे, संजय गाडे, त्रिंबक मांडे, उत्तम मांडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT