Radhakrushn Vikhe Patil 
अहिल्यानगर

Ahmednagar : वाळू डेपोबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना माफी नाहीच; विखे पाटलांचा गर्भित इशारा

सकाळ डिजिटल टीम

संगमनेर : सर्वसामान्यांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत कोणी कितीही अडथळे आणले तरी या धोरणाच्या यशस्वितेसाठी शासन समर्थ आहे. मात्र वाळू विक्री केंद्र यशस्‍वीपणे सुरु करण्‍यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्‍याचा इशारा महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला. तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे वाळू विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, वाळूच्‍या पैशातून सुरु असलेले राजकारण आणि गुन्‍हेगारीकरण थां‍बविण्‍याचा प्रयत्‍न सरकारने केला आहे. आतापर्यंत सुरु झालेल्या वाळू विक्री केंद्रातून २० हजार ब्रास वाळू उपलब्‍ध केली असून, यामधून राज्‍य सरकारच्‍या तिजोरीत ६०० रुपये दराने थेट रक्‍‍कम जमा झाली आहे.

तरीही अद्याप या व्‍यवसायातील माफीयाराज संपत नाही. जलसंपदा विभागाने वाळू उचलण्‍यास कालव्याचे कारण सांगून परवानगी दिली नव्‍हती. मग यापुर्वी वाळू उपसा होताना कालव्याची आठवण झाली नाही का असा थेट सवाल करुन, आमच्‍याही विभागातील काही आधिकारी डेपो सुरु करण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. परंतू आता हलगर्जीपणा करणाऱ्यांना माफी नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

केवळ विरोधासाठी विरोध आणि कोणत्‍याही विषयाचे राजकारण करण्‍याची भूमिका महाविकास आघाडीकडून घेतली जात आहे. अडीच वर्षात यांचे एकतरी चांगले काम सांगा, सावरकरांचा अपमान होत असताना सुध्‍दा उध्‍दव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार नाहीत. आघाडीच्‍या नेत्‍यांकडे दुर्लक्ष करा, सरकार तुमच्‍यासाठी सकारात्‍मक भूमिका घेवून काम करीत असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.

निळवंडे कालव्‍यांचे श्रेय कोणाला घ्यायचे त्‍यांनी जरुर घ्‍यावे, परंतू निमगाव जाळी येथून जाणाऱ्या कालव्‍याचे काम जाणीवपुर्वक कोणी रखडवले, उंबरीच्‍या पुलाचे काम बंद का ठेवले, संबधित ठेकेदारावर कारवाई करा आणि काळ्या यादीत टाकण्याच्या स्‍पष्‍ट सुचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍या.

याप्रसंगी जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालिमठ, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सुहास मापारी, शा‍ळीग्राम होडगर, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कैलास तांबे, सतिष कानवडे, प्रांताधिकारी शैलेंश हिंगे, तहसिलदार धिरज मांजरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्‍यातील दुध उत्‍पादक शेतकऱ्यांना न्‍याय देण्‍यासाठी गुरुवारी पुण्‍यामध्‍ये खासगी आणि सहकारी दूध संघ चालकांची महत्‍वपूर्ण बैठक बोलावली असून, पशुखाद्य कंपन्‍यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्‍यात आले आहे. दूध उत्‍पादकांवरील अन्‍याय सहन करणार नाही ही भूमिका घेवून सरकार त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणा उभे राहील.

- मंत्री विखे पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : 'तो' तरुण सिंहगडावरुन बेपत्ता झालाच नाही, प्रकरणाला वेगळं वळणं ; नेमकं काय घडलं?

Sanju Samsonचे ट्वेंटी-२०त वेगवान शतक; आता Asia Cup मध्ये त्याला सलामीला खेळवायचं की नाही, हे निवड समितीनं ठरवायचं...

Latest Marathi News Updates : फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Adani Group: एका वर्षात अदानी समूहाचे कर्ज 20 टक्के वाढले; सरकारी बँकांनी किती कोटी दिले?

Khed Shivapur Toll : शिवापूर टोल नाक्यावर गणेशभक्तांना टोलमाफी; २४ तासांत सात हजार वाहनांना सवलत

SCROLL FOR NEXT