ahmednagar  
अहिल्यानगर

सावेडीत म्हसणवटा... महासभा चुकणार का अमरधामचा हेलपाटा

अमित आवारी

नगर : बुरुडगाव येथे महापालिकेच्या कचरा डेपोच्या जागेत 100 मॅगावेट खतनिर्मित प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे सावेडी उपनगरातील कचरा डेपोच्या जागेत स्मशानभुमी, उद्यान व मल्टीपर्पज क्रीडा संकुल तयार करण्यात यावी असा प्रस्ताव महापालिकेच्या बुधवारी (ता. 29) होणाऱ्या ऑनलाईन महासभेत मांडण्यात येणार आहे. सावेडीतील कचरा डेपोला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. 

महापालिकेचे बुरुडगाव व सावेडी असे दोन ठिकाणी कचरा डेपो आहेत. सावेडी कचरा डेपोमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो महणून स्थानिक नागरिकांनी या कचरा डेपोला विरोध केला आहे. बुरुडगाव येथील कचराडेपोत खतनिर्मिती प्रकल्प होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी हा प्रकल्प बंद पाडत राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती.

अखेर महापालिकेने बुरुडगावमध्ये खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे सावेडी कचरा डेपो बंद करून तेथे अमरधाम तयार करण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. मात्र त्याच वेळी बुरुडगाव येथेही खतनिर्मिती प्रकल्प सुरू झालेला असून त्याच्याच परिसरात जैविक खत निर्मिती प्रकल्पही उभा करण्यात आला आहे.

सावेडी उपनगरात स्मशानभुमी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यातच सावेडी क्रीडा संकुलात नाट्यगृह तयार होत असल्याने सावेडी उपनगराला क्रीडा संकुल व्हावा अशी मागणी होती. सावेडी कचरा डेपोत स्मशानभूमी व क्रीडा संकुल तयार होणार का याबाबत बुधवारीच महासभेत निर्णय होईल. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT