There will be staff transfers 
अहिल्यानगर

जिल्हा परिषदेमध्ये  बदलीप्रक्रियेस वेग 

दौलत झावरे

नगर ः जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया राबविण्याचा ग्रामविकास खात्याचा अध्यादेश आज प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश काढून तालुका स्तरावरून माहिती मागविण्यास सुरवात केली आहे. बदलीप्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण करायची असल्याने, प्रशासनाकडून वेगवान हालचाली सुरू आहेत.

जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्ग सोडून इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया राबविण्याचा अध्यादेश आज ग्रामविकास खात्याकडून जिल्हा परिषदेला आला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वच संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांची तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची माहिती मागवली आहे.

ही यादी 16 जुलैला प्रसिद्ध करून त्यावर ई-मेलद्वारे हरकती मागविण्यात येणार आहेत. हरकतींनुसार संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांची अंतिम वास्तव्य ज्येष्ठता 18 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 31 जुलैपर्यंत बदल्यांची प्रक्रिया होणार आहे.

प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या होणार आहेत. त्यात सुमारे 100 प्रशासकीय, तसेच तेवढ्याच विनंती बदल्या असण्याची शक्‍यता आहे. 
प्रशासकीय बदलीप्रक्रिया न राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

मात्र, अध्यादेश काढून ही प्रक्रिया राबविण्यास पुन्हा सूचित केले आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर बदली प्रवासभत्त्याचा भार पडणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 100 बदल्या झाल्यानंतर 25 लाखांचा अतिरिक्त बोजा पडेल. 

जिल्हा परिषद प्रशासनाकडून दरवर्षी प्रशासकीय बदलीप्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रक्रियेत बदली झाल्यानंतर काही जण सेवा उपलब्ध व सेवा उपलब्धता वापर करून पुन्हा मूळ जागेवर येत आहेत. त्यात सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT