The thief brought the idol of Vitthal to Ekadashi 
अहिल्यानगर

वाल्याचा वाल्मिकी झाला, देवास मंदिरात ठेवून गेला; चोराने एकादशीला आणून ठेवली विठ्ठलाची मूर्ती

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : हरिश्‍चंद्रगडावरील मंदिरातील चोरी झालेल्या विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती अखेर सापडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. एकादशीच्या मुहुर्तावर स्वत: चोरानेच मंदिरात विठ्ठलाची मूर्ती आणून ठेवली. रुख्मिणीची मूर्ती यापूर्वीच सापडली. 

ती पोलिस पाटील बारकू भारमल यांच्या ताब्यात आहे. आता दोन्ही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती वन समितीचे अध्यक्ष चंदर भारमल यांनी दिली. दरम्यान, विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती सापडली असली, तरी चोरांचा तपास करीत असल्याचे राजूर पोलिसांनी सांगितले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मागील महिन्यात हरिश्‍चंद्रगडावरील मंदिरातून चोरांनी विठ्ठल-रख्मिणीची मूर्ती लांबवली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. दुसरीकडे, पुरातत्व खात्याने आमचा या मूर्तीशी संबंध नसल्याचे म्हणत फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतरही राजूर पोलिस या घटनेचा तपास करीत होते. ग्रामस्थही मूर्तींचा शोध घेत होते. अखेर आधी रुख्मिणीची मूर्ती हाती लागली. पोलिस पाटील बारकू भारमल यांच्या ताब्यात मूर्तीला देण्यात आले. 

एकादशीचा मुहूर्त साधून चोरांनी मंदिरात विठ्ठल मूर्ती आणून ठेवली. ग्रामस्थ आज सकाळी गेले असता, त्यांना मूर्ती आढळून आली. ग्रामस्थांनी याबाबत पोलिस पाटलांना कळविले. सध्या विठ्ठल मूर्ती गडावर, तर रुख्मिणी मूर्ती गडाच्या पायथ्याशी पाचनाई गावात असून, सोमवारी त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. स्थानिक वादातून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने आणले पाणी; सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव, बाजारात आवक वाढली

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर शहर परिसरात मध्यरात्री कोसळल्या पावसाच्या जोरदार सरी

Chhatrapati Sambhajinagar: सांगा, आम्ही जायचं कुठं?; खुद्द नगरसेविकांचा १० वर्षांनंंतरही महापालिकेत तोच सवाल

IPL 2026, Orange Cap: थेट १७ व्या स्थानावरून अव्वल स्थानी; अभिषेक शर्माचा 'ऑरेंज कॅप'वर कब्जा; टॉप-५ मध्ये कोणते खेळाडू?

मोठी बातमी! ‘ई-केवायसी’ केली नाही, यापुढे ‘लाडकी बहीण’चे पैसे बंद; १४ लाख महिलांची राहिली ‘ई-केवायसी’; उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी, त्यांनाच लाभ, वाचा...

SCROLL FOR NEXT