Thieves beat animals at Kanhur Plateau 
अहिल्यानगर

चोरांचे फिरले माथे ः कान्हूर पठारमध्ये अमानुषतेचा कळस, जो तो हळहळतोय

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार (ता.पारनेर) येथील पारनेर रोडवरून अज्ञात चोराने ट्रॅक्टर चोरून नेला. मात्र, गावातील तरूणांनी ती घटना पाहिली. त्यांनी संबंधित चोरांचा पाठलाग केला. परंतु त्यानंतर जे घडलं ते अमानुष होतं. त्यामुळे सर्वच शेतकरी, गावकरी हळहळले.

या बाबत माहिती अशी, काल (ता.०७) रोजी पारनेर रोडवर दिनकर सोमवंशी यांच्या घरासमोर त्यांचे पुतणे स्वप्निल सोमवंशी यांचा ट्रॅक्टर (एम एच १६ बी.एम.३०९२) लावण्यात आला होता. मध्यरात्री दोनच्या दरम्यान अज्ञात चोराने ट्रॅक्टरच्या लाईटच्या वायर तोडल्या. घरातील लोकांना आवाज येऊ नये म्हणून त्यांनी ट्रॅक्टर रोडपर्यंत ढकलत नेला. त्यानंतर पोबारा केला. 

तेथील दुचाकीच्यादेखील प्लग व वायर तोडून टाकल्या. जेणेकरून ट्रॅक्टर चोरल्याचे लक्षात आले तरी पाठलाग करता येणार नाही, अशी त्यांची अटकळ होती. 

गावातील तरूणांना आला संशय

गावातील स्वप्निल ठुबे व संतोष नवले नगर येथून रूग्णालयात आपल्या नातेवाइकांना भेटून गावी कान्हुर पठारला घरी निघाले होते. गावात मुख्य चौकात पोहचत असताना त्यांना सोनाई मंगल कार्यालय येथे ट्रॅक्टर जाताना दिसला. एवढ्या मध्यरात्री हा ओळखीचा वाटणारा ट्रॅक्टर कुठे चालला, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ज्या जागेवर स्वप्निल सोमवंशी यांचा ट्रॅक्टर असतो, त्या जागी जाऊन पाहणी केली. तेथे ट्रॅक्टर दिसला नाही. त्यांनी तात्काळ सोमवंशी यांना संपर्क केला.

चोरांचा पाठलाग

टाकळी ढोकेश्वरमार्गे ट्रॅक्टरच्या मागे गाडीने पाठलाग केला. हाॅर्न देऊही तो थांबत नव्हता. त्यानंतर चोरांना वाटले ट्रॅक्टर काही चोरता येत नाही. त्यामुळे त्यांनी तो ट्रॅक्टर चारीत घालला आणि पसार झाले. 

जनावरांना केली मारहाण

आपला चोरीचा मनसुबा उधळल्याने ते थोड्यावेळाने माघारी फिरले. टाकळी ढोकेश्वर रोडवर स्वप्निल ठुबे यांच्या घरासमोर येऊन ज्या चारचाकीद्वारे आपला पाठलाग करण्यात आला. त्यांच्या चारचाकीच्या (एम एच १६ ए.टी.६४३६) काचा फोडल्या.  ठुबे यांच्या गोठ्यातील जनावरांनाही मारहाण केली. चोरांनी केलेल्या मारहाणीमुळे जनावर हंबरडा फोडत होते, तरीही चोर मारहाण करीतच राहिले. या घटनेने जोतो हळहळतोय. 

या बाबत स्वप्निल सोमवंशी यांनी पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद केली. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात विकृती वाढतेय! दागिन्यांसाठी नातवाने आजीला चहातून विष पाजलं; पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला छडा

‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; साकारणार 'ही' भूमिका

Terrorist Junaid Ahmad : तुरुंगातील कैद्यांना भडकवणारा मास्टरमाईंड अद्याप मोकाट! दहशतवादी जुनैद अहमदला पकडण्यासाठी NIA कडून पाच लाखांचे रोख बक्षीस जाहीर

High Court Nagpur Bench: सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा वाढता ट्रेंड; नागपूर खंडपीठाचा कडक इशारा! काय होतं प्रकरण?

Kolhapur Foundries : कोल्हापुरात ‘ग्रीन कास्टिंग’चा पथदर्शी प्रकल्प; पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर अडवाणी, फाउंड्रीतील निर्यात वाढणार

SCROLL FOR NEXT