Thieves looted the Sarafi firm in Devdaithan 
अहिल्यानगर

देवदैठणमधील सराफी पेढी फोडली, तीन किलो चांदी लांबवली

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : तालुक्यातील देवदैठण येथे रेणुका ज्वेलर्स या सराफी पेढीचे शटर उचकटून आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानात ठेवलेले तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी या दागिन्यांची किंमत दीड लाख रुपये ठरवले असून, यापूर्वीही या ज्वेलर्सला रस्त्यात लुटून मोठी रक्कम चोरीला गेली आहे. 

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले, पंकज किशोर डहाळे रा.शिरूर यांच्या मालकीचे देवदैठण येथे असणाऱ्या रेणुका ज्वेलर्स या दुकानाचे लोखंडी शटर अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उचकटून आत प्रवेश केला.

आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना एक चोर व बाहेर चार जण असे पाच जण असल्याचे दिसत आहे. चोरट्यांनी दुकानात नव्याने आणून ठेवलेले तीन एक किलो वजनाचे एक दीड लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरले.

घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी गेले. सकाळी श्वान व तज्ञ पथक पाचारण करण्यात आले होते. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून याप्रकरणी शिरूर व श्रीगोंदे तालुक्यात चौकशी चालू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT