thieves robbed atm machine by exploding gelatin crime news  Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट घडवून लुटले ATM

सकाळ डिजिटल टीम

राहता (जि. अहमदनगर) : जिलेटिनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

लोणी खुर्दमधील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे. रविवारी ( दि.१० ) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून हे एटीएम फोडल्याची फोडले. त्यानंतर त्यातील रोकड लंपास केली. चोरट्यांनी आधी एटीएमशेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या, तसेच सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांनी घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र कड्या बाहेरुन लावलेल्या असल्याने चोरट्यांना लुटीसाठी वेळ मिळाला.

एटीएम फोडल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याठिकाणी ठसे तज्ज्ञ व डॉग स्कॉडच्या सहाय्याने तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान लोणी पोलिसांपुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, महापौर रितू तावडेंनी झटकले हात; म्हणे, लोक ऐकत नाहीत

Chakan Traffic Crisis : चाकण सोडणार, महाराष्ट्र नाही; त्रस्त उद्योगपतींनी मांडल्या व्यथा, म्हणाले- गुजरातमध्ये जाणार होतो पण...

IND vs SL Test: बुमराह, सुदर्शननंतर भारताला आणखी एक धक्का; मालिका सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूबाबत नकोशी बातमी समोर...

Marathi News Live Updates : संसदेचं कामकाज चालू द्या, मी सगळ्यांचं ऐकेन आणि उत्तर देईन : अमित शहा

Maharashtra Tender Rules: कंत्राटदारांना राज्य सरकारचा चाप, कामगिरी प्रमाणपत्र बंधनकारक; तीन श्रेणींत वर्गीकरण

SCROLL FOR NEXT