Three departments are under the charge of a single officer 
अहिल्यानगर

घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं...अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा

दौलत झावरे

नगर  : कामकाज सुरळीत व वेगाने व्हावे, म्हणून जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांमध्ये खातेप्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील दोन विभागांतील खातेप्रमुख सेवानिवृत्त झाल्याने, या विभागांची जबाबदारी एकाच विभागावर सोपविण्यात आल्याने तीन विभागांच्या कामकाजाचा गाडा एकच अधिकाऱ्याला चालवावा लागत आहे.

जिल्हा परिषदेत काही विभागांत पदे रिक्त असल्यामुळे त्यांच्या कामाचा ताण इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडत आहे. जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात कर्मचारी नसल्यामुळे, स्थायी समितीत ठराव करून तीन कर्मचाऱ्यांची येथे सेवाउपलब्धतेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजकल्याणसारखीच स्थिती जिल्हा परिषदेतील इतर विभागांची व स्वीय सहायकांच्या पदांची आहे. कर्मचाऱ्यांचे पगार इतरत्र निघत असून, त्यांना जबाबदारी इतरत्र दिली जात आहे. 

अवश्य वाचा ः येथे नांदतो अंधार...

जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे पद डिसेंबरपासून, तर सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता हे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. या दोन्ही पदांची जबाबदारी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना आपल्या विभागाचे काम पाहून इतर दोन विभागांचे कामकाज पाहावे लागत आहे.

यामध्ये सध्या पाणीपुरवठा योजनांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तसेच, उत्तर व दक्षिण विभागातील कामकाजाच्या तक्रारीही सुरू आहेत. या सर्वांचा गाडा एकाच अधिकाऱ्यावर सोपविल्यामुळे कामे धीम्या गतीने होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. 

जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा व उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर पदे रिक्त असून, ती भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन , अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT