MLA Nilesh Lanke
MLA Nilesh Lanke Esakal
अहमदनगर

पारनेरच्या तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सुवर्ण संधी

मार्तंड बुचुडे

निघोज येथे सुमारे एक कोटी रूपये खर्च करून स्पर्धा परीक्षेसाठी लागणा-या सर्व सुविधानियुक्त अशी अभ्यासिका ऊभी राहणार असल्याने पारनेरच्या हुशार व होतकरू तरूणांना अधिकारी होण्याची ही मोठी सुवर्ण संधी आहे.

पारनेर (अहमदनगर) : आमदार निलेश लंके (MLA nilesh lanke) यांच्या प्रयत्नातून निघोज येथे नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत मुलांना एम.पी.एस.सी.सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी (competitive examination) अभ्यासिका मंजूर करण्यात आली आहे. या साठी सुमारे एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार लंके यांनी दिली. त्यामुळे ही अभ्यासिका आता पारनेर सारख्या दुष्काळी मात्र शैक्षणिक दृष्ट्या प्रगत समजल्या जाणा-या तालुक्यातील तरुणांना वरदान ठरणार आहे. (through the efforts of MLA nilesh lanke, a study has been sanctioned for the competitive examination at nighoj)

पारनेर हा मुळातच शैक्षणिक दृष्ट्या अतिशय प्रगत असा तालुका आहे. सततचा दुष्काळी तालुका असल्याने शिक्षणाशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे तालुक्यातील तरुणांचे शिक्षण हेच खरे भांडवल आहे. प्रतिकुल परिस्थिती असतानाही या तालुक्याने जिल्हयालाच नव्हे तर राज्यालाही मोठ्या प्रमाणात शिक्षक, अभियंते, डॉक्टर तसेच विविध क्षेत्रात मोठ मोठे अधिकारी सुद्धा दिले आहेत. त्यातील अनेकांनी राज्यातच नव्हे तर देशात नाव कमाविले आहे. आता निघोज येथे सुमारे एक कोटी रूपये खर्च करून स्पर्धा परीक्षेसाठी लागणा-या सर्व सुविधानियुक्त अशी अभ्यासिका ऊभी राहणार असल्याने पारनेरच्या हुशार व होतकरू तरूणांना अधिकारी होण्याची ही मोठी सुवर्ण संधी आहे.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्या साठी लागणारी विविध प्रकारची पुस्तके तसेच इतर साहित्य व सुयोग्य जागाही असावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन लंके यांनी आता त्यासाठी मोठा निधी मिळविला आहे. ही अभ्यासिका मिळविल्या बद्दल आमदार लंके यांचे तालुक्यातून व विशेषत: तरूणामधून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे. (through the efforts of MLA nilesh lanke, a study has been sanctioned for the competitive examination at nighoj)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT